spot_img
अहमदनगरनगर दौंड महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात; एक ठार, चार गंभीर

नगर दौंड महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात; एक ठार, चार गंभीर

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:
नगर-दौंड महामार्गावर झालेल्या नुकत्याच एका अपघातात दोन जण जागीच ठार झाले होते. त्यापाठोपाठ आता पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून चार जण जखमी आहे.

नगर-दौंड महामार्गावरील हिवरेझरे परिसरात ०४ सप्टेंबर रोजी सकाळी भरधाव कंटेनर आणि चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारचा चक्काचुर झाला. अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात कार मधील जखमी अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच संदेश कार्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महामार्गावरील खड्ड्यांमुळे पुन्हा एक बळी
नगर-दौंड महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे पुन्हा एकाचा बळी गेला आहे. मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पावसाळा सुरू असल्याने प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडत असून, अपघातही वाढले असल्याने तातडीने या महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अन्यथा आगामी काळात मोठे अंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेना नेते संदेश कार्ले यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मतदार यादीच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय, कोणाचा फायदा, कोणाला झटका?

मुंबई / नगर सह्याद्री - एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची...

प्रतिक्षा संपणार? आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल…

मुंबई / नगर सह्याद्री राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी...

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...