टाकळी ढोकेश्वर, आळकुटी खुल्या प्रवर्गासाठी; सुपा, हंगा महिलांसाठी राखीव
पारनेर | नगर सह्याद्री-
पारनेर तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज इंदिरा भवन सभागृहात तहसीलदार गायत्री सौंदणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले. टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, गोरेगाव, कर्जुले हर्या, पिंपळगाव रोठा यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतींचे सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. तर निघोज, भाळवणी यासारख्या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आणि सुपा, हंगा येथील सरपंच पदे महिला प्रवर्गासाठी राखीव ठरली आहेत.
या आरक्षणामुळे येणाऱ्या सहा महिन्यांत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार असून, अनुसूचित जमातीसाठी राखीव गावांमध्ये इतर प्रवर्गातील उमेदवारांमध्ये निराशा पसरली आहे. तहसील प्रशासनाने सर्व ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सोडत प्रक्रियेत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण (2025-2030)
◆ अनुसूचित जाती (SC)
महिलांसाठी राखीवः पिंपळनेर, माळकुप, अस्तगाव
सर्वसाधारणः रांजणगाव मशिद, जामगाव, किन्ही
◆ अनुसूचित जमाती (ST)
महिलांसाठी राखीवः गुणोरे, भाळवणी, वडगाव आमली, म्हसणे
सर्वसाधारणः म्हसे खुर्द, निघोज, लोणीहवेली, म्हस्केवाडी
◆ नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
महिलांसाठी राखीव :
राळेगण थेरपाळ, बाबुर्डी, भोंद्रे गारगुंडी, गारखिंडी, जाधववाडी, जातेगाव, जवळा, कारेगाव, कुरुंद, पाडळी रांजणगाव, पळशी, राळेगणसिध्दी, यादववाडी, पाबळ, काळकूप
सर्वसाधारण :
खडकवाडी, चोंभूत, पळवे बु., पठारवाडी, पुणेवाडी, रायतळे, वाघुंडे खु., विरोली, वनकुटे, सुपा, वाडेगव्हाण, पळवे खु., वडुले, शेरीकासारे, गटेवाडी
◆ सर्वसाधारण प्रवर्ग
महिलांसाठी राखीवः वडनेर हवेली, मांडवे खु., रांधे, घाणेगाव, मुंगशी, पिंप्री जलसेन, कासारे, पाडळी दर्या, पिंप्री गवळी, कडुस, म्हसोबा झाप, अक्कलवाडी, चिंचोली, वाघुंडे बु., वेसदरे, काकणेवाडी, रुईछत्रपती, ढोकी, सारोळा आडवाई, वडझिरे, शहांजापूर, वडनेर बु., डिकसळ, वडगाव सावताळ, पानोली, वारणवाडी, रेनवडी, पिंप्री पठार, काताळवेढा, कळस, तिखोल, दैठणे गुंजाळ, हिवरे कोरडा, हंगा, अपधूप
सर्वसाधारणः देविभोयरे, शिरापुर, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, बाभुळवाडे, भांडगाव, भोयरेगांगर्डा, दरोडी, देसवडे, ढवळपुरी, धोत्रे बु., गांजीभोयरे, गोरेगाव, हत्तलखिंडी, कान्हुर, करंदी, कर्जुलेहर्या, कोहोकडी, लोणीमावळा, मावळेवाडी, नांदुरपठार, नारायणगव्हाण, पाडळी कान्हुर, पळसपुर, पिंपळगावरोठा, पिंपळगावतुर्क, पोखरी, सांगवीसुर्या, सावरगाव, सिद्धेश्वरवाडी, वडगावदर्या, वाळवणे, वासुंदे, पाडळी आळे