नगर सह्याद्री वेब टीम
आज (9 ऑगस्ट) रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या नात्याचा स्पेशल सण आहे. आज बहिणी भावला ओवाळते आणि रात्री बांधतो. तर भाऊ बहिणीला गिफ्ट देऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. मनोरंजनसृष्टीतही काही अशा भाऊ-बहिणाच्या जोड्या आहेत ज्या कायम एकमेकांना साथ देताना, कौतुक करताना पाहायला मिळतात. अशाच एक जोडी म्हणजे अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार (डीपी दादा) होय.
‘बिग बॉस मराठी 5’ च्या घरात हे गोड भावा-बहिणीचे नाते तयार झाले आहे. आता बिग बॉस संपल्यावरही हे दोघे हे नाते कायम जपताना दिसतात. बिग बॉसच्या घरात यांचे नाते कायम खुलताना दिसले. यांनी घरात खूप मजा-मस्ती केली आहे. यंदा रक्षाबंधनला अंकिता भारतात नसून तिच्या नवऱ्यासोबत फॉरेन टूर करत आहे. त्यामुळे तिने डीपी दादांसाठी खास रक्षाबंधन गिफ्ट पाठवले आहे.
अंकिताने बिग बॉसच्या घरात असताना डीपी दादांना राखी बांधली होती. त्यामुळे यंदा अंकिताने गिफ्ट आणि भावुक पत्र पाठवले आहे. डीपी दादांनी त्याच्या युट्युब चॅनेलवर याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. गिफ्टमध्ये अंकिता डीपी दादांना शर्ट देते आणि त्यासोबत एक पत्र असते. पत्रात डीपी दादांबद्दलच्या भावना आणि प्रेम व्यक्त करण्यात आले आहे.
अंकिताने पत्रात बिग बॉसच्या घरातील रक्षाबंधनची आठवण डीपी दादांना करून दिली आहे. तसेच तिने डीपी स्टाइल शर्ट त्यांना पाठवले आहेत. तसेच त्यातील एक शर्ट रक्षाबंधनला घालण्याचा आग्रह देखील केला आहे. पत्रासोबत अंकिताने डीपी दादांसाठी राखी देखील पाठवली असून ती ताईंकडून बांधून घेण्यास सांगितले आहे. अंकिताला रक्षाबंधनचे कोणतेही गिफ्ट नको असल्याचे तिने पत्रात म्हटले आहे. अंकिताने पत्रात म्हटले की, “हक्काने हाक मारेन तेव्हा पाठीशी उभे राहा.” अशाप्रकारे अंकिताने डीपी दादांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.