spot_img
अहमदनगरपारनेर तहसीलमध्ये अनानोंदी कारभार; कोण काय म्हणाले पहा...

पारनेर तहसीलमध्ये अनानोंदी कारभार; कोण काय म्हणाले पहा…

spot_img

रेशनकार्डांसह शैक्षणिक दाखले मिळेनात
पारनेर | नगर सह्याद्री
सर्वसामान्यांच्या शिधापत्रिकांसह इतर शैक्षणिक व शासकीय दाखल्यांबाबत मोठ्या प्रमाणावर अडवणूक केली जात असल्याचा आरोप करीत तहसील कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांच्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील पुरवठा शाखा संजय गांधी निराधार योजना, कूळ कायदा यांच्यासह इतर विभागातील कारभारामध्ये सुधारणा करावी. अन्यथा १२ जुलैला आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

रेशन कार्ड, तसेच विविध दाखल्यांसंदर्भात नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार गणेश आढारींना नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन दिले. यावेळी चंद्रभान ठुबे, डॉ. नितीन रांधवन, माजी सरपंच रवींद्र राजदेव, पोपट गुंड, अ‍ॅड. गणेश कावरे, दत्ता ठाणगे, अमित जाधव, सचिन पठारे, गणेश मोरे, भाऊ चौरे, तक्रारदार उपस्थित होते.

प्रशासनाने सर्वसामान्यांना न्याय द्यावा
पारनेर तहसील मध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे. वेळोवेळी विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना दाखले व रेशन कार्ड चे कागदपत्र मिळत नाहीत. तरी प्रशासनाने योग्य ती नियोजन करावे आणि सर्वसामान्यांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही आंदोलन करू.
-दत्ता ठाणगे (निलेश लंके प्रतिष्ठान)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...