spot_img
ब्रेकिंगआनंद वार्ता! राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? 'या' यॊजनेची रक्कम मंजूर..

आनंद वार्ता! राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? ‘या’ यॊजनेची रक्कम मंजूर..

spot_img

Maharashtra News: राज्यातील हजारो शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मध्ये नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागलं. या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारने एकूण 3,720 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला असून त्यापैकी 9 मे 2025 पर्यंत 3,126 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

उर्वरित रकमेतील 307 कोटी रुपयांचे वाटप लवकरच होणार असून, 287 कोटी रुपये विमा कंपन्यांना दुसरा हप्ता दिल्यानंतर वितरीत केले जाणार आहेत. शेतकरी संघटनांनी सरकारकडे लवकरात लवकर दुसरा हप्ता वितरित करण्याची मागणी केली आहे. या भरपाईसाठी चार वेगवेगळ्या ट्रिगरवर आधारित मंजुरी देण्यात आली आहे: स्थानिक नैसर्गिक आपत्ती – ₹2,720 कोटी, हंगामातील प्रतिकूल हवामान–₹713 कोटी, काढणी पश्चात नुकसान – ₹270 कोटी, पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान – ₹18 कोटी मंजुरी देण्यात आली.

सध्या स्थानिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल हवामान या दोन घटकांअंतर्गतच भरपाई वाटप सुरू आहे. कारण राज्य सरकारने फक्त पहिल्या हप्त्याचा निधी विमा कंपन्यांना दिला आहे. या अंतर्गत मंजूर एकूण रक्कम 3,433 कोटी रुपये असून त्यापैकी 3,126 कोटी रुपये वाटप पूर्ण झाले आहे. काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान या टप्प्यांतील भरपाईसाठी शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हे वाटप राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना दुसरा हप्ता दिल्यानंतरच होणार आहे. स्थानिक आपत्ती अंतर्गत: ₹2,418 कोटी, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत: ₹708 कोटी, या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असला तरी, उर्वरित भरपाईसाठी तातडीने निधी वितरण करण्याची गरज शेतकरी संघटनांनी मांडली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...