spot_img
ब्रेकिंगShikhar Bank scam case: 'अजित पवार' यांच्या अडचणीत वाढ! समाजसवेक 'अण्णा हजारे'...

Shikhar Bank scam case: ‘अजित पवार’ यांच्या अडचणीत वाढ! समाजसवेक ‘अण्णा हजारे’ यांची न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आव्हान देणार आहेत. अजित पवार यांना दिलेल्या लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार असून त्यासंदर्भात त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान या प्रकरणी २९ जूनला पुढची सुनावणी होणार आहे.

अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांना वेळ दिला आहे. तर २९ जूनला पुढची सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना लीन चिट दिली आहे.

राज्यातील बहुचर्चित तब्बल २५ हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींच्या अडचणी वाढल्या होत्या. पण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिलासा दिला. तसेच, या घोटाळ्या प्रकरणी कोणतेच पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटलें. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींना दिलासा देण्यात आला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांना देखील या प्रकरणी दिलासा देण्यात आलेला.

पोलिसांनी या प्रकरणी जानेवारी महिन्यात लोजर रिपोर्ट सादर केला होता. बँकेच्या कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत अनियमितता असल्याचे आरोप अजित पवार आणि इतर आरोपींवर करण्यात आलेले. लोजर रिपोर्ट सादर करतांना कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्री संबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा देण्यात आलेला.

अण्णा हजारे यांचे अभिनंदन:  खा. राऊत
अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. राळेगणसिद्धीमध्ये अजित पवारांविरोधात हालचाल सुरू झाली. अण्णा हलले, अण्णा बोलले या बद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. पण या महाराष्ट्रात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या १० वर्षांत राज्यात आणि देशात घोटाळेच घोटाळे झाले आहेत. घोटाळ्यांचा पाऊस सुरू झाला आहे. अण्णांनी त्या इतर घोटाळ्यांविरोधातही आवाज उठवला पाहिजे,अशी प्रतिक्रिया शिवसेना(उबाठा) नेते खा संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...