spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: लिफ्ट देण्याच्या बहाणा,अन भलताच कुटाणा? नगरच्या युवका सोबत घडलं असं...

Ahmednagar Crime: लिफ्ट देण्याच्या बहाणा,अन भलताच कुटाणा? नगरच्या युवका सोबत घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटले. तसेच, त्याची सुटका करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे १५ लाखांची खंडणी मागण्यात आली. पाथर्डी रस्त्यावर तिसगाव येथे गाडी थांबली असता त्याने गाडीतून पळ काढला व स्वतःची सुटका करून घेतली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. अनिरुध्द विठ्ठलराव जरे (वय २५, मूळ रा. शिंगवे तुकाई, ता. नेवासा, हल्ली रा. सुभश्री आपार्टमेंट, गुलमोहर रोड) असे या युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जरे यांची शिंगवे तुकाई (ता. नेवासा) येथे शेती आहे. गुरुवारी ते त्यांच्या वडिलांसह शेतीची पहाणी करण्यासाठी गेले होते. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नातेवाईकाबरोबर ते पांढरी पूल येथे आले. तेथे बसची वाट पाहत एका कार मधून आलेल्या दोघांनी त्यांना नगरला सोडतो, असे सांगितल्याने ते गाडीत बसले.

घाट चढून इमामपूर येथे आल्यावर अनिरुद्ध याला बंदुकीचा धाक दाखवून गळ्यातील चेन व हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली. त्याचा फोन घेऊन त्यात दोघांनी त्यांचे सिमकार्ड टाकले व त्याच्या वडिलांना फोन लावून १५ लाखांची खंडणी मागितली. गाडी पाथर्डी रस्त्यावर तिसगाव जवळ थांबल्यावर अनिरुद्ध याने गाडीतून पळ काढला. एका दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्या फोनवरून त्याने वडिलांशी संपर्क साधला व स्वतःची सुटका करून घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

गाडीतील दोघांनी अनिरुद्ध याच्या गळ्यातील गळ्यातील चेन व हातातील सोन्याची अंगठी, मोबाईल, पाकीट काढून घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...

तर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

नागपूर / नगर सह्याद्री - खडतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण...