अहमदनगर। नगर सहयाद्री-
माणुसकीचा नात्याला काळिमा फासणारा प्रकार नगर शहरात घडला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शहबाज शेख (रा. कोठी, अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: नगर शहरातील एका भागात राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी शिक्षण घेते. बुधवारी सकाळी तिचे वडिल १० वाजता कामावर गेले होते .त्यावेळी ती घरी एकटीच होती. दुपारी १२ वाजता शाळेत जाण्यासाठी तिची मैत्रिण घरी आली होती. दरम्यान साडेबाराच्या सुमारास फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादीकडे मोबाईल मागितला असता तिने देण्यास नकार दिला.
त्याने तगादा लावल्याने फिर्यादीने तिच्या वडिलांचा मोबाईलनंबर दिला, काही वेळाने त्याने फिर्यादीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. फिर्यादी पाणी आणण्यासाठी गेली असता त्याने घराचा दरवाजा आतून बंद करत तिचा हात धरून अतिप्रसंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.