spot_img
ब्रेकिंगमाणुसकीला काळीमा फासणारी घटना; मुलासमोरच पत्नीची हत्या! कारण आलं उजेडात..

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; मुलासमोरच पत्नीची हत्या! कारण आलं उजेडात..

spot_img

पुणे । नगर सहयाद्री
पुण्याच्या खराडी भागातील एक धक्कादाक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पतीने प्रापर्टी हडपण्याच्या संशयावरून पत्नीची आपल्या मुलासमोरच हत्या केली आहे. एवढ्यावरच न थांबता नराधम पतीने हत्येचे व्हिडिओ शूटिंग केले. यानंतर नराधम पती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला.

सदरची घटना बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निर्दयी पतीने शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नीच्या मानेत भोसकून अत्यंत निर्दयीपणे पत्नीची हत्या केली आहे. या घटनेनंतर पुन्हा कायदा सूव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून दोषीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

आरोपी पतीविरोधात खराडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ज्योती शिवदास गिते असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...