spot_img
अहमदनगरधक्कादायक! डुप्लिकेट मतदान करण्याचा 'ऑडिओ बॉम्ब'; जाहीर प्रचार संपण्याआधी समोर आला खळबळजनक...

धक्कादायक! डुप्लिकेट मतदान करण्याचा ‘ऑडिओ बॉम्ब’; जाहीर प्रचार संपण्याआधी समोर आला खळबळजनक प्रकार

spot_img

जाहीर प्रचार संपण्यास काही तासांचा अवधी बाकी असताना
समोर आली क्लीप | निवडणूक आयोगाकडे विखे यांची तक्रार
अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास काही तासांचा अवधी बाकी असताना नगरमध्ये बुथ प्रमुखांचा आढावा घेताना धक्कादायक आदेश दिले आहेत. त्याची ऑडीओ लीप बाहेर आली असून आपल्या कार्यकर्त्यांनी सकाळीच डुप्लीकेट मतदान करून घ्या असे आदेशच या ऑडीओमधून दिल्याचे समोर आले आहे. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. बुथ प्रमुखांना आदेश देत असल्याचे यातून समोर आले आहे. याबाबत आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सार्‍यांच्याच नजरा लागल्या आहेत.

ऑडीओ क्लीपमधील संवाद
आदेश देणारा – आता आपल्याला जागृतपणे रहावा लागणार. विशेषकरुन बाहेर फिरण्यापेक्षा आपल्या बुथवर लक्ष ठेवावे लागणार आहे. गावात बसून राहून त्या लोकांवर वॉच ठेवावा लागणार. आपल्यातील काही लोक प्रवाहात आले नाहीत. अशा लोकांना प्रवाहात आणणे अपेक्षित आहे. त्यांच्याशी संपर्क करणे. काही लोकांची मागणी माझ्याशी संपर्क करण्याची असेल तर त्यांचा संपर्क करुन देणे. हे आपल्या हातात आहे. गावात थांबून रहाणे. समोरच्या उमेदवाराचा प्रचार करणारे पैसे वाटपावर जास्त भर आहे. हे थांबविणे. पैसे वाटप करतांना काही व्हिडीओ क्लिप व्हायरल करणे. आपल्याला बर्‍याच गावांमध्ये एकतर्फी वातावरण आहे. जे लोक पैसे वाटण्यासाठी आले आहेत. त्यांना सांगा चार दिवस पाहुण्यासारखे आमच्या गावात राहिले, आता तुम्ही जा. आमच्या तालुक्याचा अस्मितेचा प्रश्न आहे. आमच्या तालुक्याचे भवितव्य पाहु द्या. गावागावातून त्यांना बाहेर काढून देणे अपेक्षित आहे. परत एकदा जाता जाता हात जोडून विनंती करतो. माझे भविष्य तुमच्या हातात आहे. निवडणुकीसाठी दोन दिवस अलर्ट राहणे गरजेचे आहे. तुम्ही पारनेरला गेले, नगरला गेले, शिरुरला गेले तर काही होणार नाही. फोन ठेवल्यापासूनच निवडणुक प्रक्रियेला पूर्ण ताकदीने तयारीला लागायचंय.

समोरील व्यक्ती – बुथ मधल्या सर्वांना सुचना आहे की डुप्लीकेट मतदान होणार नाही याची काळजी बुथ प्रमुखांनी घ्यावी.

आदेश देणारा – बुथ प्रमुखांना परत एकदा सुचना देणार आहे. कोणाचे डुप्लीेकेट मतदान होणार नाही याची काळजी घ्या. आपले डुप्लीकेट मतदान सकाळ सकाळ करुन घ्या. कोणाचे डुप्लीकेट मतदान करुन द्यायचे नाही याचा अर्थ आपले डुप्लीकेट मतदान करायचे नाही असा नाही. आपले डुप्लीकेट मतदान करुन घ्या. आपल्या बर्‍यापैकी गावांनी समोरच्या उमेदवाराला काही चित्र नाही. समोरच्या बुथवर असणार्‍याला समजून सांगा. तु कशाला विरोध करतो. तालुक्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्याला शांत करुन आपल्याला निवडणूक काढता येईल.

समोरील व्यक्ती – सगळ्यांनी काळजी घ्या. ग्रामपंचायत सारखे मतदान प्रत्येकाने घडून आणले पाहिजे. जे बाहेरचे व्यक्ती आहेत त्यांना बोलून घ्या. १३ तारखेचा दिवस महत्वाचा आहे. सहकार्यांशी संपर्क करा. बारा एक वाजेपर्यंत जेवढे मतदान घडून आणता येईल तेवढे घडून आणा. दुपारचे लोक बाहेर येत नाहीत. ही सर्व बुथ प्रमुखांना आमदार साहेबांच्या वतीने विनंती.

आदेश देणारा – रेणवडीच्या बुथवाल कोणी आहे का लाईनवर….

समोरील व्यक्ती – आहेत नेते त्यांना कॉन्टॅक्ट करतो… त्यांना सांगतो…

आदेश देणारा ः त्यांना नाही बोलता येत का आपल्या समोर, त्यांना बोलता येत नाही का..

समोरील व्यक्ती – येवढे सारे साडेचार हजार जण समोर जॉईन झाले की आवाज येत नाही.

आदेश देणारा – किती लोक जॉईन झाले..

समोरील व्यक्ती – झालती साडेतीन ते चार हजार लोक जाईन…

आदेश देणारा – कळतो का तो आकडा.

समोरील व्यक्ती – हो सर मी पाठवून देईल आकडा

आदेश देणारा – आज संध्याकाळी परत घ्यायची आपल्याला…

समोरील व्यक्ती – ठिक आहे परत घेऊ संध्याकाळी. सर्वांना पुढील दोन दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा….

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...