नवी दिल्ली:-
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालापूर्वी स्टॉक मार्केटबाबत केलेल्या विधाना प्रकरणी इंडिया आघाडीचे खासदार आज सकाळी ११ वाजता सेबीकडे तक्रार करणार आहेत.
तक्रार करण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या खासदारांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतली. यावेळी तृणमुलचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी सागरीका घोष,अरविंद सावंत, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल जाहीर होण्यापूर्वी ३ जून रोजी शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतरच ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, त्यावेळी मात्र बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळाली होती.
याप्रकरणी काँग्रेसने शेअर बाजारातील या चढ-उताराला सर्वात मोठा घोटाळा ठरवून चौकशीची मागणी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेअर बाजारात विक्रमी वाढ झाल्याचं सांगत अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकांना शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला असल्याचा आरोप केला होता.