श्रीगोंदा । नगर सहयाद्री
२९ जून २०२५ रोजी अंतरवाली येथे होणाऱ्या राज्यव्यापी मराठा समाजाच्या नियोजन बैठकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक आज सोमवारी (ता. २३ जून) सकाळी ११ वाजता श्रीगोंदा शहरातील शनि चौक येथील वृद्धेश्वर बँकेच्या पाठीमागे उत्साहात पार पडली.
या बैठकीस तालुक्यातील मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुकाप्रमुख मराठा सेवक निलेश कुरुमकर, तसेच तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या भारतीताई इंगवले, शोभा भालचंद्र काळे, सोनाली राम शिंदे आणि माया दीपक खेंडके या भगिनींची विशेष उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना भारतीताई इंगवले यांनी तालुक्यातील सर्व मराठा समाजसेवकांनी २९ जून रोजी होणाऱ्या अंतरवाली बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
या बैठकीला कचरू शेठ वागस्कर, शरद वाणी, गुरु गायकवाड, गौतम दांगडे, भानुदास वाबळे, प्रकाश शिर्के, सतीश औटी, गणेश औटी, भास्कर कुदांडे, भोजराज मोटे, महेश झेंडे, सागर सुंबे, संदीप सावंत, संदीप गायकवाड, संतोष मांडे, सागर जंगले, महेश वागस्कर, गणेश बारगुजे यांसह अनेक मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.