spot_img
अहमदनगरराज्यात वाढले बिबट्यांचे प्रमाण; आ. सत्यजीत तांबे यांनी केली मोठी मागणी, आता...

राज्यात वाढले बिबट्यांचे प्रमाण; आ. सत्यजीत तांबे यांनी केली मोठी मागणी, आता ‘ती’ परवानगी द्या…

spot_img

राज्य शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवावा
संगमनेर । नगर सहयाद्री
राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा बिबट्याने हजेरी लावल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे हल्ले व बिबट्याची दहशत ही बाब ग्रामीण भागात नित्याचीच झालीये. लोकवस्ती असलेल्या ठिकाणी देखील त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये वन्यप्राण्यांसह, शेतकरी, सामान्य माणूस तसेच लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. यात अनेकांचे प्राण देखील गेले आहेत. याच पार्श्वभुमीवर आमदार सत्यजीत तांबेंनी राज्याच्या वन मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. वन विभागाने पकडलेल्या बिबट्यांची लगेच त्याच ठिकाणी नसबंदी करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्रशासनाकडे तातडीने पाठवण्याची मागणी आ. सत्यजीत तांबेंनी केली आहे.

राज्यात बिबट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून जास्त लोकस्वस्ती असलेल्या ठिकाणी देखील त्यांचा वावर वाढलेला आहे. तसेच बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकरी, सामान्य माणूस तसेच लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी हल्ले झाले असून त्यामध्ये लहान मुलांचे प्रमाण खूप आहे व बहुतांशी मुलांचा मृत्यू देखील झाल्याचे आ. सत्यजीत तांबेंनी पत्रात म्हंटले आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील दीड वर्षाची ओवी सचिन गडाख हिच्यावर बिबट्याचा हल्ला झाला व त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात पाणी भरायचं असेल किंवा काही काम करायचे असेल तर त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे वनविभागाने पकडलेल्या बिबट्यांची नसबंदी करणे गरजेचे आहे. याच संदर्भात आ. सत्यजीत तांबेंनी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली होती.

या भेटीत केंद्र शासनाने बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी देण्याची मागणी आ. तांबेंनी केली होती. परंतु, राज्य शासनाने याबाबतचा प्रस्ताव पाठविल्यास केंद्र शासन त्याबाबतचा सकारात्मक विचार करून मंजुरी देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने याबाबतचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवावा, अशी मागणी आ. सत्यजीत तांबेंनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...