Maharashtra Crime News: पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजे असतानाच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यात एका 19 वर्षीय तरुणीवर निर्जन स्थळी चाकूचा धाक दाखवत दोन नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर त्यांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून पीडितेकडे असलेले दागिने लुटून तेथून फरार झाले. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सदरची घटना शनिवारी रात्री घडली. पीडित महिला तिच्या चुलत भावासोबत घराजवळील निर्जन ठिकाणी बसली होती. वेळी दोन अज्ञात तरुण दुचाकीवर तिथे आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला.
इतकेच नव्हे, तर पीडितेला आणि तिच्या चुलत भावाला आक्षेपार्ह स्थितीत येण्यास भाग पाडून संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ देखील शूट केला. या गुन्हेगारांनी केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेकडील सोन्याची नथ आणि पेंडेंट घेऊन पसार झाले. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.