जालना | नगर सह्याद्री
हैदराबाद गॅजेटनुसार मराठा आरक्षणासाठी असलेला जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार ओबीसीला पाठिंबा देत मोर्चा काढत आहेत. मात्र हा मोर्चा खऱ्या अर्थान ओबीसीचा नसून, काँग्रेससाठी रचलेला आहे. ओबीसीच्या नावाखाली काँग्रेसला मोठे करण्याचे काम सुरू असून, ते राजकारणात स्वतःला सेटल करत आहेत, असा जोरदार टोला मनोज जरांगे यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला आहे. हे सर्व राहुल गांधींच्या सांगण्यावरून केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काही दिवसांपूव मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस जीआर रद्द करण्याच्या मुद्द्यावर जरांगे म्हणाले, मराठ्यांना नियमात असून देखील संघर्ष करावा लागत आहे. सगळे पुरावे असताना आम्हाला त्रास दिला जातो. दबावात जीआर निघत नाही आणि रद्द ही होत नाही. संविधानाच्या सर्व चौकटीत राहून काम करावे लागते. 10 तारखेला निघणाऱ्या काँग्रेसच्या मोर्च्यांना समजून घ्या.
मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर राज्यातील धनगर, बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यावर जरांगे पाटील बोलले. धनगर समाज असेल, आदिवासी समाज असेल, बंजारा समाज असेल, यांनी एकत्र बसून समज-गैरसमज दूर करणं गरजेच आहे. जर बंजारा समाजाच्या नोंदी असतील, तर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न कराव हे माझं मत आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, जरांगेंना एके47 द्या आणि ओबीसींचा खात्मा करा असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला जरांगे यांनी प्रतिउत्तर देत म्हटलं आहे. ओबीसीत 374 जाती आहेत, सगळं तुम्हालाच पाहिजे का? या वडेट्टीवार साहेबांच्या वक्तव्याचा ओबीसींनी विचार करणं गरजेच आहे. ओबीसींना आमच मराठ्यांच 16 टक्के आरक्षण काढून खोटं आणि बोगस आरक्षण दिलं.
ओबीसींचा खरा घात कोणी केला असेल, तर येवल्याच्या अलिबाबांनी आणि काँग्रेसच्या पूवच्या नेत्यांनी. त्यांना माहित होतं, 14 टक्के आरक्षण मंडल कमिशनने ओबीसींना दिल आहे. 16 टक्के आरक्षण मराठ्यांच आहे हे माहित असताना सुद्धा दिलं. ओबीसींची खरी फसवणूक, वाटोळं कोणी केलं असेल, तर ओबीसी नेत्यांनीच केल आहे. हे सगळं राहुल गांधींच्या सांगण्यावरून केले जात आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.