spot_img
अहमदनगरAlert! पावसाने विश्रांती घेतली पण ‘या’ ११ जिल्ह्यांना धोकाच...

Alert! पावसाने विश्रांती घेतली पण ‘या’ ११ जिल्ह्यांना धोकाच…

spot_img

Maharashtra weather update: महाराष्ट्रात यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा 12 दिवस आधीच दाखल झाला असून कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु आता काही भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आजपासून राज्यात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राजस्थान परिसरात निर्माण झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे आणि उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस पावसात चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास होऊ शकतो. हवामान खात्याने अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या 11 जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

या भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस विजांचा कडकडाट, वादळी वारे (50 किमी प्रतितास) आणि मुसळधार पावसाचा जोर कायम राहील. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे वडवणी तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटला आहे. अमरावती आणि धाराशिव जिल्ह्यांत अर्ध्या तासात इतका पाऊस झाला की रस्ते पाण्याखाली गेले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मात्र पावसाचा जोर कमी असून अधूनमधून हलक्याशा सरी पाहायला मिळत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला रक्तबंबाळ केलं; कारण काय?

Crime News: एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संतापाच्या भरात प्रियकरानं प्रेयसीच्या गळ्यावर चाकू...

…नगरमधील गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय; एका रात्रीसाठी ६ हजार; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Crime News: गुवाहाटीतील जोया नगर परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश...

श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानात तर्फे श्रावण मासानिमित्त भव्य कार्यक्रम

महाद्वार मिरवणूक । कुस्त्यांचा हागामा पारनेर । नगर सहयाद्री: पिंपळगाव रोठा येथील लाखो भाविकांचे...

अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी ‘उडान प्रकल्प’चा निर्धार

पारनेर तालुक्यात कार्यशाळा; १५ ऑगस्टला 'बालविवाहमुक्त गाव' ठराव संमत होणार पारनेर । नगर सहयाद्री बालविवाहासारख्या...