spot_img
अहमदनगरदुदैवी! अपघातात माय-लेकाचा मृत्यू; अहिल्यानगर मधील घटना

दुदैवी! अपघातात माय-लेकाचा मृत्यू; अहिल्यानगर मधील घटना

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री-
जिल्ह्यातील बीड-पाथर्डी राज्य महामार्गावर शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोमनाथ पुंडलिक खेडकर (वय २०), ताराबाई पुंडलिक खेडकर (वय ६०, रा. करोडी, ता. पाथर्डी) असे मृत झालेल्या माय-लेकाचे नाव आहे.

शुक्रवारी (दि. ६) रोजी दुपारी सोमनाथ आपल्या ताब्यातील दुचाकी वरुन आई ताराबाई हिला घेउन धार्मिक कार्यक्रमासाठी गेला होता. तो कार्यक्रम उरकून पाथर्डीहून करोडीकडे दुचाकीवरून जात असताना कारेगाव येथे सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान मोहटा देवीकडून येणाऱ्या (एमएच १६.बी. एच. ३१५२) चारचाकी वाहनाने माय- लेकाचा दुचाकीला जोरदार धडक दिली.

इतका भीषण होता की, आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. चारचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गाडी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन आदळली. या गाडीतील ही प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...