Crime News: आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आळंदीतील एका खासगी शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला आहे. शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. १२ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे आळंदीमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदीतील एका खासगी आध्यात्मिक शिक्षण संस्थेत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पाहुणा म्हणून आलेल्या एका २८ वर्ंषाच्या आरोपीने या शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले. १२ वर्षांच्या दोन मुलांवर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केले. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या महेश नामदेव मिसाळ मामा आणि त्याच्या बहिणीविरोधत आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या दोघांवर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महेश नामदेव मिसाळ मामा या आरोपीला आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आळंदी पोलिस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहे.
या घटनेमुळे आळंदीमध्ये खळबळ उडाली आहे. या खासगी आध्यात्मिक शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेप्रकरणी स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत