spot_img
अहमदनगरअजितदादा कडाडले, निलेश लंकेंचा घेतला खरपूस समाचार

अजितदादा कडाडले, निलेश लंकेंचा घेतला खरपूस समाचार

spot_img

पार्सल घरी पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मतदारांना आवाहन  
पारनेर | नगर सह्याद्री
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला असून शेवटच्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. शुक्रवारी सकाळी कर्जत येथे आणि दुपारी पारनेरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेत आमदार रोहित पवार व माजी आमदार निलेश लंके यांचा खरपूस समाचार घेतला. पारनेरच्या सभेत निलेश लंके याचा बंदोबस्त करा अन त्याचे पार्सल घरी पाठवा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत, पारनेरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, मागच्या विधानसभा निवडणुकीत तुमच्या सांगण्यावरुन निलेश लंकेला उमेदवारी दिली. परंतु, आता तो तुमच्याही पुढचा निघाला आहे. लंके आमदार असताना मी अर्थमंत्री होतो. त्यांना साडेचार वर्षांत मी निधी दिलेला आहे. त्यामुळे जो विकास दिसतोय त्यामागे मी आहे. कोणतेही काम करताना अनुभव असला पाहिजे.

पारनेरमध्ये अधिकारी, उद्योजक, कर्मचार्‍यांवर दादागिरी केली जात आहे. आमच्या कार्यकर्त्यांनाही बघून घेण्याची भाषा वापरली जात आहे. हे मी कदापीही खपवून घेणार नसल्याचा खणखणीत इशारा देत निलेश लंकेंचा बंदोबस्त करा अन पार्सल घरी पाठविण्याचे आवाहन यावेळी मतदारांना केले. तसेच अहमदनगर जिल्ह्याचा विका करायचा असेल तर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पदाधिकार्‍यांची भाषणे झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...