spot_img
महाराष्ट्रबारामतीबाबत अजित पवार यांचे सूचक विधान; आता मलाच सगळं..., तुफान फटकेबाजी

बारामतीबाबत अजित पवार यांचे सूचक विधान; आता मलाच सगळं…, तुफान फटकेबाजी

spot_img

बारामती / नगर सह्याद्री –
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० तारखेला मतदान होत आहे. त्यातही काही ठिकाणच्या लढती रंजक होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातीलच एक म्हणजे बारामतीचा मतदारसंघ आहे. याठिकाणी पवार कुटुंबातील सदस्यच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत . दरम्यान, या मतदारसंघाविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “आगामी काळात बाकीच्यांचं वय बघता मलाच या बारामतीचं सगळं बघायचं आहे, “असे वक्तव्य केले आहे.

जित पवार बुधवारी बारामती तालुक्यातील लोणी भापकर, जळगाव कडेपठार आणि मेदड या तीन गावांचा दौरा करत आहेत. पुढे बोलताना अजित पवार यांनी, “मी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काम करत नाही. मी फुशारक्या मारत नाही, तर माझं काम सगळं सांगतं. लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता. तुम्ही घेतला आताची निवडणूक माझ्या भवितव्याच्यादृष्टीने महत्त्वाची आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. ते बुधवारी लोणी भापकर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत राजकीय फटकेबाजी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात काल सभा झाली. त्यांनी कुणावर टीका केली नाही. मागच्यावेळी केली तर गडबड झाली. आता फक्त विकासावर बोलले. लोकसभेला पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या. आता पण सांगतात साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाकडे लक्ष द्या. आयला अवघडच आहे. मी पण पुतण्या आहे ना? मुलगी झाली की थेट नातूच काढला. मुलासारखाच आहे ना? असे अजित पवार यांनी म्हटले.

लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता. तुम्ही घेतला आताची निवडणूक माझ्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. काही प्रमुख नेते आहेत, त्यांच्यात माझे नाव आहे. नाव व्हायला वेळ लागतो. 2004 पासून मला थोडं सीनियर म्हणायला लागले. तेव्हापासून मी राज्याच्या राजकारणात लक्ष घालायला लागलो. शरद पवार साहेबांनी 30 वर्षे राज्यात काम केल्यानंतर ते दिल्लीत गेले, असे अजित पवार यांनी म्हटले.

अजित पवारांचा युगेंद्र पवारांना टोला
आपल्या तालुक्यातील मुले काम करीत असतील तर त्याला मलिदा गँग का म्हणता? आज विरोधात बोलायला काही नाही म्हणून ते काहीही मलिदा गँग बोलतात. काम करीत असताना जातीचा आणि नात्या गोत्याचा विचार केला नाही. गावातले पुढारी नीट वागत नाही. त्याचा राग माझ्यावर निघतो. ही निवडणूक झाल्यावर काही नवीन चेहऱ्यांना मी पुढे आणेल. तुम्ही मला थेट खासदार केलं नाही. त्याआधी मी काम करत होतो. साहेब मुख्यमंत्री झाल्यावर मी तालुक्याला कसा फायदा होईल ते बघितले. 89 ला साहेब म्हणत होते मी अजितला तिकीट देणार नाही. 91 ला मला तिकीट दिले. आता काही लोक काल काम सुरू केलं नाही की, त्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली, अशा शब्दांत अजित पवारांनी युगेंद्र पवार यांना लक्ष्य केले.

मला इंग्लिश येऊ नाहीतर येऊ नये, परंतु मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मी साडेसहा लाख कोटींचा बजेट सादर करतो. साडेसहा लाख कोटी मधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं. तो माझा पुतण्या आहे. मी त्याच्यावर टीका नको करायला. मी सुनेत्राला उभा नव्हतं करायला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा! दोन अपक्ष बाजी मारणार

महायुती 7, मविआ 3 तर 2 अपक्ष बाजी मारणार! नगर शहरात कमालीची उत्सुकता | श्रीगोंदा,...

शिरसाटवाडी मतदान केंद्रावर काय घडलं?; काय म्हणाल्या आमदार मोनिकाताईं राजळे? वाचा सविस्तर..

पाथर्डी | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे...

अदानी अडचणीत; अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे....

CM पदाबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान; थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या...