spot_img
महाराष्ट्रअजित पवारांचं कुटुंबाबत मोठं विधान; आता पवार घराण्यातील कटुता...

अजित पवारांचं कुटुंबाबत मोठं विधान; आता पवार घराण्यातील कटुता…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. आज त्यांनी आपल्या घराण्याबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे. राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असे मला वाटत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले अजित पवार?
राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल, असे मला वाटत नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हे वक्तव्य करुन अजित पवार यांनी एकप्रकारे आगामी काळात शरद पवार यांच्याशी पुन्हा जुळवून घेणे शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील का? हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल.

सुप्रिया सुळेंबाबत अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आपण शरद पवार यांच्याशी संपर्कात नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. जास्त कधी संबंध आला नाही. मी माझ्या कामात व्यस्त असतो, ते त्यांच्या कामात व्यस्त असतात. सुप्रिया सुळे यांच्याशी मी एक-दोन वेळा फोनवर बोललो आहे असे अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भिगारकरांना खुशखबर; भाजपच्या पाठपुराव्याला यश, एसटी महामंडळाचा ‘मोठा’ निर्णय

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- भिंगार शहरातून जाणाऱ्या सर्व एसटी बस गाड्यांना भिंगारमध्ये थांबा देण्याचे...

शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात घेतला गळफास

शनिशिंगणापूर । नगर सहयाद्री शनैश्वर देवस्थानचा कंत्राटी कर्मचारी शुभम विजय शिंदे (वय २२, रा....

खासगी बँकेचा संतापजनक प्रकार; कर्जाचे पैसे न दिल्याने एजंटने बायकॊला नेलं उचलून अन्..

News: उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील मोंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी बँकेने कर्ज वसुलीच्या...

मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका

मालेगाव । नगर सहयाद्री:- मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ...