spot_img
ब्रेकिंगलाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही,...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातात. मात्र अलीकडेच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये या रक्कमेत वाढ करून २१०० रुपये करण्याची कोणतीही घोषणा झाली नाही. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली. तसेच ही योजना बंद होणार असल्याचा आरोपही केला जात आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.

अजित पवार यांनी लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत. मात्र ही योजना बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचललं पाऊल
“लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणार आहे. या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो. 1500 रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळत आहे. महिला सक्षमीकरणासाठी एक मोठ पाऊल सरकारने उचललं आहे,” असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

परवाच विधान परिषदेत गटनेते प्रविण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली. लाडकी बहिण योजनेच अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना मुंबई बँकेत १० ते २५ हजारापर्यंतची कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका, सहकारी बँका आहेत. ज्या महिलांना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढु शकता, असे सर्वांना आवाहन करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

“लाडकी बहीण योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकू. कारण सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून बहीण सक्षम होऊन तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे, मोठे योगदान मिळेल,” असेही त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या बसला भीषण आग, २० जणांचा होपळून मृत्यू, 16 जण…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी दुपारी भरधाव एसी बसला अचानक भीषण...

झेडपीसाठी मोठी अपडेट, 28 ऑक्टोबरला अंतिम…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 जुलै...

आझाद ठुबे यांचा स्पेस कोण भरून काढणार?

जवळा जिल्हा परिषद गटात रस्सीखेच | सुजित झावरे, दीपक लंके, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत,...

मुंबईतील पक्ष बैठकीनंतर आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप...