spot_img
ब्रेकिंगअजित पवार मुख्यमंत्री होतील; मंत्र्याच्या वक्तव्यानं महायुतीत खळबळ

अजित पवार मुख्यमंत्री होतील; मंत्र्याच्या वक्तव्यानं महायुतीत खळबळ

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे आणि भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं विधान सरकारमधील मंत्री बाबासाहेब मोहनराव पाटील यांनी केले आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि राज्याच्या विकासासाठी असलेल्या त्यांच्या दृष्टिकोनचे कौतुक देखील केले. मात्र, हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

पक्षप्रमुख अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून भविष्यात तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं मत बाबासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलं. पुढं ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील चांगलं काम करतायत. परंतु, भविष्यात निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, हे फक्त माझं वैयक्तिक मत आहे. माझा कोणालाही विरोध करत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. पवार यांच्याकडे वित्त मंत्रालयाचा कार्यभार देखील आहे. 11 मार्च रोजी अजित पवार यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना, अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना योजनेसाठी एकूण 36,000 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...