spot_img
ब्रेकिंगवैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अजित पवारांकडून मोठी कारवाई, काय केले पहा...

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर अजित पवारांकडून मोठी कारवाई, काय केले पहा…

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात मोठी राजकीय कारवाई झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. वैष्णवी हगवणे या त्यांच्या सुनेने सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती.

वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. तिच्या पतीसह सासू आणि नणंदला अटक करण्यात आली असून, सासरा आणि दीर फरार आहेत. पोलिसांच्या चार पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, या मागणीनं जोर धरला होता. दरम्यान, पक्षाने निर्णय घेत त्यांची हकालपट्टी केली आहे. याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात सुरज चव्हाण यांनी माहिती देताना सांगितलं की, ‘अजित पवारांचं पुणे सीपींसोबत बोलणं झालंय. त्यांनी दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाईल’, असं ते म्हणाले.

सुरज चव्हाण हगवणे यांच्या बडतर्फच्या कारवाईवर म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हगवणे यांचा कोणताही संबंध नाही, त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलेलं आहे. अजित पवारांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांना अनेकवेळा संबोधित करताना कुणीही चुकीचं वागला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, टायरमध्ये घालून मारलं जाईल, अशा पद्धतीच्या सुचना दिल्या होत्या. आज अजित पवारांनी पुणे सीपींशी बोलून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?
सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासू, नणंद या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, सासरा आणि दीर फरार असल्याची माहिती आहे. सासरा आणि दीराला शोधण्यासाठी तपासासाठी पोलिसांच्या ४ पथके रवाना करण्यात आले आहे. तसेच आज राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बडतर्फ करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...