spot_img
ब्रेकिंगनिवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांना धक्का! शेकडो समर्थकांसह 'बड्या' नेत्यांचा शरदचंद्र पवार गटात...

निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांना धक्का! शेकडो समर्थकांसह ‘बड्या’ नेत्यांचा शरदचंद्र पवार गटात प्रवेश

spot_img

नाशिक | नगर सह्याद्री
नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काल शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शरदचंद्र पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला जबर धक्का बसला आहे.

दरम्यान, सकाळी हा धक्का दिल्यानंतर विदर्भातील महत्त्वाचा आणि खासदार प्रफुल्ल पटेलांचा गृहजिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादी आणि प्रफुल्ल पटेलांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत लांजेवार यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. राज्यामध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलीय. त्यातच प्रफुल पटेल यांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादीला रामराम करत आज नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या जवळपास हजार कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला असून हा प्रफुल पटेल यांना मोठा धक्का समजला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...

बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

मुंबई / नगर सह्याद्री - बिहार विधानसभा निवडणूक २०२५चा आज (१४ नोव्हेंबर) निकाल जाहीर...

बिबट्यांचे हल्ले; पालकमंत्री विखेंनी घेतली मोठी भूमिका

बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ८ कोटी १३ लाखांचा निधी – पालकमंत्री डॉ....