spot_img
ब्रेकिंगअजित पवार कडाडले, 'हे' इथे चालणार नाही; योगींना दिलं रोखठोक प्रत्युत्तर

अजित पवार कडाडले, ‘हे’ इथे चालणार नाही; योगींना दिलं रोखठोक प्रत्युत्तर

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘ बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील प्रचार सभेत अजित पवार म्हणाले की ते म्हणाले की,बटेंगे तो कटेंगे’ यूपीमध्ये चालेल, पण महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्र हा साधु-संतांचा, शिवप्रेमींचा, शाहू फुले आंबेडकरांचा आहे, असे पवार यांनी सांगितले.

बीडमधील प्रचारसभेत अजित पवार म्हणाले की, कोणी काही बोलले तर त्याचे आम्ही समर्थन करणार नाही. आम्ही येथील जनतेच्या पाठिशी आहोत. आमच्याकडून मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत माझ्या विचारधारा शिव-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित आहेत. आम्ही जात, पंथ, नात्याच्या आधारावर भेदभाव करत नाही. भेदभावामुळे समाजाची हानी होते.

आमची विचारधारा शिव-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित आहेत. आम्ही जात, पंथ, नात्याच्या आधारावर भेदभाव करत नाही. भेदभावामुळे समाजाची हानी होते. मी आमच्या वाट्याला आलेल्या जागांतून 10 टक्के जागा मुस्लिम समाजाला दिल्या आहेत. ज्यावर तो पराभूत होईल अशा जागा दिल्या नाहीत.

ज्या जागांवर मुस्लीम समाजाचे उमेदवार निवडून आले ते मी दिले आहेत. मी नजीबमुल्ला यांना तिकीट दिले, नवाब मलिक यांना तिकीट दिले, मला विरोध झाला पण मी स्वतः त्याच्या प्रचारासाठी गेलो होतो. सना मलिक यांच्या प्रचारासाठीही मी गेलो होतो. झीशान सिद्दीकी यांनाही आम्ही तिकीट दिले. हसन मुश्रीफ, शेख आणि अशा अनेक कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिले आहे.

आम्ही महायुतीमध्ये एकत्र काम करत आहोत, पण आमच्या पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत, असे अजित पवार म्हणाले होते. आपण सर्वजण समान किमान कार्यक्रमावर आपले सरकार चालवतो. देशाच्या विकासासाठी आपण सर्वजन काम करत आहोत. आजही आम्ही शिव शाहू फुलेंच्या विचारांनी पुढे जात आहोत. इतर राज्यात हे चालेल, पण महाराष्ट्रात ते चालणार नाही. भाजपच्या इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काय बोलावे ते त्यांचं त्यांनी ठरवावे असंही अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा! दोन अपक्ष बाजी मारणार

महायुती 7, मविआ 3 तर 2 अपक्ष बाजी मारणार! नगर शहरात कमालीची उत्सुकता | श्रीगोंदा,...

शिरसाटवाडी मतदान केंद्रावर काय घडलं?; काय म्हणाल्या आमदार मोनिकाताईं राजळे? वाचा सविस्तर..

पाथर्डी | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे...

अदानी अडचणीत; अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे....

CM पदाबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान; थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या...