spot_img
महाराष्ट्रअजित पवारांचं ठरलं; किती जागांवर केला दावा पहा...

अजित पवारांचं ठरलं; किती जागांवर केला दावा पहा…

spot_img

विद्यमान आमदारांनाच तिकीट | ७० हून अधिक जागांवर दावा

मुंबई | नगर सह्याद्री
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ७० पेक्षा जास्त जागांवर दावा केला जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक पार पडली त्यातून ही माहिती समोर आली आहे. विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नसल्याची हमीही अजित पवारांनी दिली असल्याची माहिती आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.
२०१९ साली राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आले होते. त्यात आणखी १५ जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केली जाणार आहे. विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नाही अशी बैठकीत हमी देण्यात आली.

आमदारांसोबत झालेल्या बैठकीत फक्त १५ जागा वाढवून मागण्यांची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे आता ७० पेक्षा जास्त जागांवर दावा करण्यात येणार आहे. या आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यातील ८० जागांवर दावा करण्याची तयारी होती. दरम्यान, आधीपासूनच महायुतीत भाजप मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि नंतर राष्ट्रवादीचा नंबर लागतो. अजित पवार गटाने ७० जागांवर दावा करत असले तरी काही ठिकाणी एकाच जागेवर दोन पक्षांचा दावा होऊ शकतो. त्यावर महायुतीतील नेते कसा निर्णय घेतील हे आगामी काळात पाहणे महत्वाचे आहे.

अजित पवारांना धक्का
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुक लागणार आहे. या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. ईश्वर बाळबुद्धे यांनी घरवापसी करणार असल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थित घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...