spot_img
अहमदनगरपारनेरमध्ये अजित पवारांनी फुंकले रणशिंग; एकी टिकवा अन्यथा..., नेमकं काय म्हणाले पहा...

पारनेरमध्ये अजित पवारांनी फुंकले रणशिंग; एकी टिकवा अन्यथा…, नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

एकाला कोणाला तरी उमेदवारी मिळणार : अजित पवार / विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादीचा मेळावा

पारनेर / नगर सह्याद्री –
राज्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. पारनेर विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खा. निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांचे नाव निश्चित मानले जात आहे परंतु विरोधी उमेदवार कोण ? हा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सुद्धा कायम आहे.
पारनेर येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार असे म्हणाले की पारनेरमध्ये उमेदवारीसाठी सगळे इच्छुक आहेत. सगळयांनाच आमदार व्हावे वाटते. सुजित झावरेंना मागे संधी दिली मात्र त्यांना जमले नाही. त्यांना पुन्हा संधी हवी आहे. काशिनाथ दाते यांचे वय झाले म्हणून त्यांना संधी हवी आहे. विजय औटी नगराध्यक्ष होते म्हणून त्यांनाही संधी हवी आहे तर नगरचे म्हणून माधवराव लामखडे यांना उमेदवारी हवी आहे. एकाला कोणाला तरी उमेदवारी मिळणार आहे. तुम्ही एकी टिकविली तर समोरच्या उमेदवारला पराभूत करू शकता. नाहीतर खासदारकी व आता आमदारकी सुद्धा एकाच घरात जाईल असे अजित पवार यांनी पारनेर येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना स्पष्टच सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषि समितीचे मा. सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष सुजित झावरे, माधवराव लामखडे, प्रशांत गायकवाड, विजय औटी, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, कपिल पवार, बाळासाहेब नहाटा, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, मा. सभापती अरुण ठाणगे, शिवाजी गुजर, भास्कर उचाळे, सुप्रिया अमोल साळवे, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, अंजली आव्हाड, सुषमा रावडे, विमल झावरे, योगिता औटी, विकास रोकडे, अमोल रोकडे, प्रसाद कर्नावट, सरपंच संजय काशीद, नगरसेवक अशोक चेडे, निजाम पटेल, रखमा कापसे, पंढरीनाथ उंडे, बाळासाहेब बोरकर, प्रभाकर कवाद, खंडू भुकन, शेखर काशीद, विठ्ठल झावरे, स्वप्निल राहींज, सतीश पिंपरकर, बाळासाहेब रेपाळे, मनोज झावरे, इंजि. निकील दाते, सतीश गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे बोलताना म्हणाले पारनेर तालुका दुष्काळी तालुका पण, सुपा एमआयडीसी आल्यावर पारनेरचं चित्र बदललं. परंतु त्या एमआयडीसीत ही दहशत केली जात आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी वीज माफी केली आहे. पारनेरमध्ये सगळ्यांना शून्य रुपये वीज बिल आलं आहे.
जरी मी राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तरी, मी शेतामध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो. पीक चांगलं आणायचा प्रयत्न करतो. दुधाचा व्यवसाय मी केला आहे. शेतीचा व्यवसाय मी केलाय आणि पोल्ट्रीचा व्यवसाय देखील केला आहे. तेलंगणामध्ये एक-एक लाख हॉर्स पॉवरच्या मोटर टाकून पावसाचं वाहून जाणारं पाणी अडवलं जातं आणि जिरायती भागात शेतीला वापरलं जातं. आम्ही शेतकऱ्यांसाठी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. केंद्र सरकारची ‘हर घर नल’ ही एक योजना आहे.
शेतकऱ्यांना सोलरवर वीज देण्याचं आम्ही काम केलं आहे. दुधावर प्रतिलिटर ७ रुपये अनुदान आम्ही दिलं आहे. कांदा निर्यात बंदी उठवली आहे. केंद्र सरकारच्या विचारांचं सरकार तुम्ही राज्यात आणलं तर, जागतिक बँकेचे विकासकामाचे पैसे आपण आणू. ऊसाचा एमएसपीचा दर मी वाढवून द्यायला सांगितला आहे. एक रुपयात पीक विमा आम्ही शेतकऱ्यांना देऊ केला आहे. साखर कारखान्यांना चांगला भाव मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ. मला कारखाने चांगले चालवता येतात. माळेगावमध्ये ३६३६ रुपये टन भाव दिला आहे. माझ्या सोमेश्वरनं ३५७१ भाव दिला आहे. सर्व शासकीय योजना पुढची पाच वर्षे सुरू राहतील पण एकच विनंती की, येत्या निवडणुकीत तुम्हाला राष्ट्रवादीचं बटन दाबावं लागेल. असे उपमुख्यमंत्री पवार यावेळी आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

झावरे, औटी, दाते समर्थकांमध्ये बॅनरवॉर

अजित पवार पारनेर मध्ये येण्यापूर्वीच हिंद चौकात विधानसभेचे इच्छुक उमेदवार असलेले सुजित झावरे, विजय औटी, काशिनाथ दाते यांच्या समर्थकांनी गर्दी करत हातात बॅनर घेत घोषणाबाजी करून मोठे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.

पतसंस्थांचे घोटाळे करणाऱ्यांना सोडणार नाही

पारनेर तालुक्यात काही चांगल्या, वाईट पतसंस्था आहेत. जनतेचे पैसे घेता आणि ते बुडविता ? अशा लोकांना मी सोडणार नाही मग ती व्यक्ती कितीही मोठी असो असे सांगत पतसंस्थांमध्ये घोटाळे घालणाऱ्या पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी इशारा दिला.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...