spot_img
महाराष्ट्रअजित दादांचा नवा 'डाव', पार्थ पवार मावळ नव्हे शिरूमधून ! खा.अमोल कोल्हेंची...

अजित दादांचा नवा ‘डाव’, पार्थ पवार मावळ नव्हे शिरूमधून ! खा.अमोल कोल्हेंची चिंता वाढली

spot_img

पुणे / नगर सह्याद्री :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघासह शिरुर लोकसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना खासदार होऊन दाखवण्यासाठी थेट चॅलेंज दिले होते. त्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पवार फॅमिली कामाला लागली आहे.
अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना थेट चॅलेंज दिल्यानंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघात दौरा करत मोर्चे बांधणी केली आहे.

पार्थ पवार यांच्या भेटीगाठींनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ऍटिव्ह मोडमध्ये आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुयातील वाघोली येथे सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना कटके व माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यानंतर पार्थ पवार आणि आता सुनेत्रा पवार यांचे वाढते दौरे हे अमोल कोल्हे यांचे टेन्शन वाढवणारे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरुवातीला खासदार अमोल कोल्हे अजित पवार यांच्या बाजूने असल्याचे चित्र पाहायला मिळाले; पण लगेच त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले.

यानंतरच्या काळात अमोल कोल्हे कधी अजित पवारांसोबत तर कधी शरद पवार यांच्या सोबत दिसले. त्यानंतर अजित पवार यांनी कोल्हे यांना इशारा देत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देणार आणि निवडून आणून दाखवणार असल्याचा इशारा दिला. इशार्‍यानंतर अजित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदार संघात दौरा केला.

त्यानंतर पार्थ पवार सातत्याने हडपसर परिसरात पदाधिकार्‍यांच्या भेटी घेताना दिसले. शनिवारी शिरूर मतदारसंघातील वाघोली परिसरात उपमुख्यमंत्री पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली.

शिरूरमधून पार्थ पवार लढणार ?
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळेच सुनेत्रा पवार हळदी कुंकू कार्यक्रमांना हजेरी लावून महिलांशी संवाद साधत असल्याचीही चर्चा आहे. यामुळे अमोल कोल्हे यांचे टेन्शन वाढले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...