spot_img
राजकारणअजितदादा दिल्लीचे ‘चरणदास’ झालेत, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

अजितदादा दिल्लीचे ‘चरणदास’ झालेत, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुरु आहे. राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात बंड होऊन दोन्ही पक्ष फुटले. सत्तानाट्यात अजित पवार हे देखील सहभागी झाले व ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.

दरम्यान काल ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीस दिल्लीला गेले होते. जवळपास ४० मिनिटे दोघांत चर्चा झाली. यांवरून आता संजय राऊत यांनी मोठा घणाघात केला आहे. ते म्हणाले, अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीचं कारण काहीही असेल. पण मराठ्यांनी राजकारणातला स्वाभिमान विकला आहे.

ते दिल्लीचे चरणदास झाले आहेत. तुम्ही आजारी असल्याने कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही. तुम्ही थकला आहात. दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटणार नाही, असे तुम्ही सांगितले होते. ठीक आहे, हा तुमचा प्रश्न आहे. पण लोक सहसा आजारी व्यक्तीला भेटायला येतात. पण मी पहिल्यांदाच डेंग्यूने त्रस्त असलेल्या व्यक्तीला नेत्याला भेटायला जाताना पाहिलं होतं. हे दुर्देव आहे, असे राऊत म्हणाले.

अमित शाह यांनी भेटायला यायला पाहिजे होते
अजित पवारांना डेंग्यू झालेला आहे. मी त्यांना चालताना पाहिलं. त्यांचे खांदे खाली आले आहेत. अजितदादांना विश्रांतीची गरज आहे. उलट त्यांनाच दिल्लीतील प्रमुख नेत्यांनी भेटायला यावे.

अमित शहा यांनी शरद पवारांच्या घरातील एका बड्या नेत्याला फोडलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत ४० आमदार आहेत. अशा नेत्याला स्वत: अमित शाह यांनी येऊन भेटलं पाहिजे होतं. पण आजारी माणसाला अंथरुणातून उठून दिल्लीला जावं लागलं ही महाराष्ट्रावर आलेली वेळ आहे, अशी टीका त्यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...