कोपरगाव। नगर सहयाद्री
बालपणात आजी-आजोबा लहान बळाचे मित्रचं असतात. आजी- आजोबा लहान लेकराला आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु काही महाभाग यापेक्षा वेगळे निघतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका आजीबाईनं ४ वर्षाच्या नातीला ५ हजारात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अधिक माहिती अशी: आजीने मुलीला तुझी आई आली आहे तिच्याकडे जाऊ या. आपण आईस्क्रीम खाऊ असे सांगून तिचे पैशाच्या हव्यासापोटी अपहरण केले. मूलबाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशिनाथ उल्हाळे यांनी सलीमा बेगम अजिज खान यांच्याकडून ५ हजार रुपयांमध्ये मुलीला विकत घेतले.
याप्रकरणी सलीमा बेगम, अजिजा खान आणि अलका काशिनाथ उलाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान मुलीला तिच्या मामाकडे सोपवले. असून आजीकडूनच नातीला विकल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.