spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय बारसकरांची 'प्रहार'मधून हकालपट्टी ! अंजली दमानिया यांचाही...

मनोज जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय बारसकरांची ‘प्रहार’मधून हकालपट्टी ! अंजली दमानिया यांचाही बारसकरांविषयी मोठा गौप्यस्फ़ोट

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री टीम : अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. आता या आरोपानंतर त्यांच्यावर प्रहार पक्षाने कारवाई केली आहे. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर त्यांची प्रहार जनशक्ती पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बारसकर हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते. प्रहारने पत्रक काढत म्हणाले की, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचित करण्यात येते की, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांचा आदेश आहे की, पक्षामध्ये कोणीही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण किंवा नेत्यांबद्दल कोणतीही भूमीका मांडू नये. असे केल्यास त्या व्यक्तीचा प्रहार जनशक्ती पक्षाशी काहीही संबध राहणार नाही.

पक्षाची अधिकृत भुमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हेच स्वतः मांडतील. इतर कोणीही अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय आपली भूमिका मांडू नये. आज दि. २१/०२/२०२४ रोजी अजय महाराज बारस्कर यांनी जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांचेविषयी मांडली त्या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही किंवा काहीही संबध नाही. तरी अजय महाराज बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा पक्षाशी आजपासून काहीही संबध राहणार नाही, असं या पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान बारसकर व जरांगे यांचा वाद लावून देण्यामागे सरकारचा हात असल्याची टीकाही होत आहे. अंजली दमानिया यांनीही तशीच शंका व्यक्त केली आहे. जरांगेंनी ताकदीने लढा दिला यात काहीच शंका नाही. पण, त्यांचा लढा हाणून पाडण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचे दिसत आहे. आधी भुजबळांना उभं केलं आणि आता वाट्टेल ते बोलण्यासाठी या अजय महाराज बारसकरांना उभं केलं आहे. जे जरांगे म्हणत आहेत, तेच सत्य आहे. हे १० टक्के आरक्षण कोर्टात टिकणार नाही. सगळ्याच राजकारण्यांनी दगा दिला. पण, शिंदेंकडून ही अपेक्षा नव्हती, असे म्हणत अंजली दमानिया यांनी सरकावर हल्लाबोल केला आहे. तसेच, अजय महाराज बारसकर यांना सरकारनेच उभं केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी; GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा...

पवार कुटुंब एकत्र येणार नाही? सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत दिली माहिती

बारामती / नगर सह्याद्री - दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे सर्वदूर...

ओबीसी समाजाला मोठा धक्का! आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टाकडून तेलंगणाच्या काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम...

बेशिस्त वाहनचालकांना झटका; दीड लाखाचा दंड वसूल, शहरात पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी बुधवारी (दि. 15) धडक कारवाई...