spot_img
अहमदनगरश्रीरामपूरच्या तरुणाचे भयंकर कृत्य! २३ वर्षीय तरुणीला दिले गुंगीचे औषध; पुढे घडलं...

श्रीरामपूरच्या तरुणाचे भयंकर कृत्य! २३ वर्षीय तरुणीला दिले गुंगीचे औषध; पुढे घडलं असं काही..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
गुंगीचे औषध देऊन २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदरचा प्रकार रविवार दि. २६ जानेवारी रोजी नगर-पुणे रस्त्यावरील एका लॉजमध्ये घडला. याप्रकरणी पीडित तरुणीने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे अहमद हसन सय्यद ( खंडाळा, ता. श्रीरामपुर, जि.अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी पीडित २३ वर्षीय तरुणी श्रीरामपुर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून कामानिमित्त सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. पीडित तरुणी ११ वी मध्ये शिक्षण घेत असताना आरोपी देखील त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान पीडित तरुणीची आणि आरोपीची ओळख झाली होती. ते फोन सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क करत होते.

पीडित तरुणी मंगळावर दि.२१ जानेवारी रोजी लग्न सोहळ्यानिमित्त श्रीरामपर येथे आली होती. लग्न सोहळा पार पडल्यानंतर रविवार दि. २६ जानेवारी रोजी पुणे येथे जाण्यासाठी श्रीरामपुर एस टी स्टॅण्डला आली असता त्यावेळी अहमदने फोन केला. मी पण पुण्याला चाललो आहे, तु माझ्यासॊबत माझ्या गाडीमध्ये चल असे म्हणाला. ओळखीचा असल्याने पीडित तरुणी बसली.

प्रवासा दरम्यान उलटी होवु लागल्याने अहमदने गाडीमध्ये असलेली पाण्याची बाटली पिडितेला दिली. पाणी पिल्यानंतर चक्कर आली. त्यानंतर अहमदने रस्त्यावरील लॉजवर तरुणीला नेले. त्यानंतर पुन्हा पीडितेला पाण्यात गुंगीचे औषध दिले. त्यानंतर आरोपीने अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....