spot_img
अहमदनगरAhmednagar: पुन्हा 'एमआयडीसी' परिसरात तरुणावर सापासप वार!

Ahmednagar: पुन्हा ‘एमआयडीसी’ परिसरात तरुणावर सापासप वार!

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगर शहरातील एमआयडीसी परिसरात तरुणावर धारदार शस्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी (दि. २१) रात्री साडेआठच्या सुमारास नागापूरच्या पितळे कॉलनीत घटना घडली. वेंद्र भगवान शर्मा (रा. कातोरे वस्ती, बोल्हेगाव) असे जखमी इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी शर्मा यांच्या जबाबावरून रवी अंकुश आंधळे, संतोष अंकुश आंधळे (दोघे रा. जिरेवाडीता. पाथर्डी) व तीन अनोळखी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहाराच्या-वादातून प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

रवी आंधळे, संतोष आंधळे व इतर तिघे नागापूरच्या पितळे कॉलनीत आले. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास देवेंद्र शर्मा ही तेथे होते. दरम्यान पाच जणांनी मिळून शर्मा यांच्यावर कोयता, कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. पत्नीला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर शर्मा यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार काशिनाथ दाते धावले शेतकऱ्यांच्या मदतीला; सरकारकडे केली मोठी मागणी

पारनेर । नगर सहयाद्री आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना गुरुवार (ता. ३) चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व...

तिघांनी केली न्यायालयाची फसवणूक; नगरमध्ये अजब प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- खोटे संमतीपत्र व शपथपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार...

चार जणांच्या टोळक्याचे युवकावर धारदार शस्त्राने सपासप वार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- एका युवकावर चार जणांनी धारदार शस्त्र व लाकडी दांडक्यांनी...

शिर्डीत दुहरी हत्याकांड! दरोडेखोरांनी बाप-लेकाला संपवल

Ahilyanagar Crime News: एकीकडे शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे...