अहमदनगर। नगर सहयाद्री-
शहरातील एका डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये सदर प्रकार घडला आहे. तपासण्यासाठी आलेल्या अज्ञात रुग्णांने डॉक्टरचे एटीएम कार्ड चोरून एक लाख ६० हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याची घटना घडली. याप्रकरणी डॉ. सुधाकर रामचंद्र तिटकारे (वय ६६ रा. समतानगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. तिटकारे यांच्या ओपीडीची वेळ सकाळी ११ ते दुपारी दोन व दुपारी चार ते सायंकाळी सहा अशी आहे. डॉ. तिटकारे हे नेहमीप्रमाणे त्यांच्या ओपीडीत असताना त्यांच्याकडे रुग्णांची ये-जा सुरू होती. त्याच दरम्यान त्यांनी पर्समधील एटीएम काढून सोप्यावर ठेवले तेथून ते अज्ञात व्यक्तीने एटीएम चोरून नेले.
दरम्यान डॉ. तिटकारे यांना मोबाईलवर ६० हजार, ५० हजार व ५० हजार काढले असल्याचे तीन मेसेज आले. त्यांनी बँकेत जाऊन खात्री केली असता त्यांच्या एटीएमवरून एकूण एक लाख ६० हजार रुपये काढल्याची माहिती मिळाली.
दरम्यान डॉ. तिटकारे यांनी घरात एटीएमचा शोध घेतला असता ते मिळाले नाही. त्यांना खात्री झाली की, त्याचा वापर करून खात्यातून एक लाख ६० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली आहे.