spot_img
अहमदनगरअहमदनगर: अज्ञात व्यक्तीने एकट्याला गाठले, विळद घाटात नको तेच घडले!

अहमदनगर: अज्ञात व्यक्तीने एकट्याला गाठले, विळद घाटात नको तेच घडले!

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री: –

विळद (ता. नगर) शिवारातील गवळीवाडा वॉटर फॉल येथे फिरण्यासाठी गेलेल्या युवकाला अज्ञात पाच जणांनी मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, चांदीची चेन, अंगठी व रोकड असा सहा हजार ९०० रूपयांचा ऐवज लुटला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात काल, मंगळवारी पहाटे दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

वैभव उत्तम सहजराव (वय २१ रा. जांब, ता. जि. परभणी, हल्ली रा. पंचवटीनगर, भिस्तबाग चौक, सावेडी, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. विळद शिवारातील गवळीवाडा वॉटर फॉल परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना पाच अज्ञात व्यक्तीने एकट्याला गाठले.

गचंडी पकडून लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडयाने मारहाण केली. त्यांच्याकडील मोबाईल, एक चांदीची चेन, एक चांदीची अंगठी व ४०० रूपये रोख रक्कम असा सहा हजार ९०० रूपयांचा ऐवज काढून घेतला.

दरम्यान, सदरचा प्रकार वैभव यांनी मंगळवारी एमआयडीसी पोलिसांना सांगून या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात पाच जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सातव्या मजल्यावरून कोसळला कामगार; जागीच मृत्यू, अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील कल्पवृक्ष सोसायटीमध्ये सुरू असलेल्या इमारत बांधकामादरम्यान...

सासुरवाडीने काढला जावयाचा काटा! घरगुती वादात कुऱ्हाडीने वार नंतर…

Maharashtra Crime : कौटुंबिक वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातेसंबंधातील...

आजचे राशी भविष्य! दोन राशींसाठी आजचा दिवस लाभदायक… वाचा तुमच्या राशीत आज काय?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका - अन्यथा...

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....