spot_img
अहमदनगरअहमदनगर: 'ते' दोघे घरात आले, 'इतका' ऐवज घेऊन पसार झाले! मुलीनेच दिली...

अहमदनगर: ‘ते’ दोघे घरात आले, ‘इतका’ ऐवज घेऊन पसार झाले! मुलीनेच दिली कपाटाची चावी? आईची पोलिस ठाण्यात धाव..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये ओळखीच्या व्यक्तीने कपाटाची चावी घेऊन त्यातील सुमारे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 35 हजारांची रोकड असा एक लाख 92 हजारांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (1 जुलै) घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारीका भरत आवारे (वय 40, रा. निसर्ग रो-हौंसिग, गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. विशाल बाबासाहेब पाटोळे व नयन पाटोळे (दोघे रा. गांधीनगर, बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. शनिवारी (29 जून) सकाळी, नेहमीप्रमाणे सारीका व त्यांचे पती कामावर गेले असता, त्यांची मुलगी व मुलगा घरीच होते.

सारीका यांनी दोन ग्रॅमचे सोन्याचे कॉईन करून ते दुपारी चार वाजता कपाटात ठेऊन त्या पुन्हा कामावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी व मुलगा घरी होते. त्यांच्या पतीचा पगार झाल्याने त्यांनी पतीला पगाराचे पैसे कपाटात ठेवण्यास सांगितले. पतीने रात्री आठ वाजता पैसे ठेवण्यासाठी कपाट उघडले असता त्यांना कपाटात असलेले सोन्याचे दागिने व रोकड दिसून आली नाही. त्यांनी पत्नी सारीकाला माहिती दिली.

दोघांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने सांगितले की, ‘सायंकाळी सात ते साडेसात वाजता मी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना विशाल पाटोळे व नयन पाटोळे घरात आले होते. त्यावेळी विशाल याने कपाटाची चावी मागितली व मी त्याला कपाटाची चावी दिली. काही वेळ ते घरात थांबले व पाठीमागील दरवाजाने निघून गेले.’

कपाटातील साडेचार तोळ्याचा सोन्याचा राणीहार, दीड तोळ्याचे कानातील सोन्याचे झुंबे, अर्धा तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एक तोळ्याच्या पाच लहान सोन्याच्या अंगठ्या, चार ग्रॅमचे कॉईन व 35 हजारांची रोकड असा एक लाख 92 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. पोलिसांनी दोघांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार जी. जी. गोर्डे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी प्रथम पुरस्कार’

राहाता । नगर सहयाद्री:- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४...

लाडक्या बहिणींना दिलासा! पती व वडील हयात नसलेल्या महिलांनाही KYC करता येणार, वाचा प्रोसेस..

मुंबई | नगर सहयाद्री:- लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा दिलासा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना शुभ ‘गुरुवार’

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा...

मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलांचे डोळे धोक्यात! नेत्रतज्ज्ञांच्या 6 सोप्या टिप्स वाचा एका क्लिकवर

नगर सहयाद्री वेब टीम आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि ऑनलाइन क्लासेसमुळे लहान मुलांमध्ये...