spot_img
अहमदनगरअहमदनगर: मंदिरातील पादुकांसह दानपेटी चोरणारा २४ तासात जेरबंद! 'असा' अडकला जाळ्यात

अहमदनगर: मंदिरातील पादुकांसह दानपेटी चोरणारा २४ तासात जेरबंद! ‘असा’ अडकला जाळ्यात

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
चिचोंडी पाटील येथील श्रीराम मंदिरातून पादुकांसह दानपेटी चोरी होण्याची घटना घडली होती. नगर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत २४ तासात आरोपीला जेरबंद केले. महादेव बाळू माळी (रा. चिंचोडी पाटील) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी : पुजारी बाळासाहेब आनंदा बेल्हेकर यांनी नगर तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला होता. फिर्यादीत म्हटले होते की, ते २० मार्च २०२४ रोजी पहाटे पाच वाजता पूजा करण्यासाठी मंदीरात गेले असता मंदीराचा दरवाजा उघडा होता. श्रीरामांच्या मुर्तीसमोरील पादुका व दानपेटी चोरून नेल्याचे आढळले.

पोलिसांना समजताच नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद गीते यांना तत्काळ तपासाच्या सूचना दिल्या. गीते यांनी स्वतः पथकासह गावातील सर्व सीसीटीव्ही चेक करून तपासाची चक्रे फिरवत आरोपीला २४ तासाच्या आत जेरबंद केले.

त्याच्याकडून एक हजार रुपयांच्या पादुका, ५०० रुपयांची दानपेटी, २५० रुपये देणगीची रक्कम असा १ हजार ७५० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद गीते, पोलीस अंमलदार शैलेश सरोदे, सोमनाथ वडणे, शिवाजी खरात आदींच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....