आरोपीकडून मोबाईलमध्ये चित्रीकरण
अहमदनगर। नगर सहयाद्री
मुलाला मारण्याची धमकी देत झाडाझुडपात नेऊन महिलेवर अत्याचार केल्याची घटना नगरमध्ये घडली. बाळू राजाराम उल्लारे (रा. हरिमळा, नगर-सोलापूर रोड) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेने याबाबत पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली.
अधिक माहिती अशी : आरोपी बाळू राजाराम उल्लारे याने पीडितेला तू मला आवडते, माझ्या बरोबर संबंध ठेव अशी मागणी केली. तसेच मागणी पूर्ण न केल्यास दोन पैकी एका मुलाला मारुन टाकण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून बळजबरीने झाडाझुडपात नेऊन पीडितेच्या इच्छे विरोधात अत्याचार केला. त्यावेळी त्याने मोबाईल मध्ये व्हीडीओ रेकॉर्डीगही केले. पीडितेने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. अधीक तपास पोलीस करत आहेत.