spot_img
अहमदनगरअहमदनगर: दोन गटात तुफान राडा! पाच जखमी, कुठे घडला प्रकार?

अहमदनगर: दोन गटात तुफान राडा! पाच जखमी, कुठे घडला प्रकार?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती परिसरात झाडावरील पेरू तोडल्याच्या कारणावरून दोन गटांत दगडफेक आणि धारदार शस्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहा ते सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी: शहरातील वॉर्ड नं 3 येथे राहणारे आशा उईके या त्यांच्या पुतण्यांसोबत रेशन घेऊन घरी परतत असताना, मोरगे वस्ती येथील गणपती मंदीर टॉवर रोड परिसरात पप्पू शेटे यांच्या घराजवळ रोडवर त्यांचा भाचा सत्या उईके याने खाली पडलेला पेरु खाण्यासाठी उचलला.

परंतु अरफान शेख याने झाडावरून पेरू तोडला असा गैरसमज करुन सत्या यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा त्यांची पुतणी जयनी उईके हिने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांचेे काही ऐकून न घेता हरभजन उईके यांस जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर धारदार शस्राने वार करून जखमी केले.

या झटापटी मध्ये अ‍ॅन्थोनी उईके याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या देखील हाताला दुखापत झाली आहे. तसेच हुजैप शेख याने त्याच्याकडील लोखंडी रॉडने जयनी उईके, दिपीका उईके यांना मारहाण केली. तसेच फिरोज फिटरवाला याच्यासोबत इतर 4 ते 5 अनोळखी साथीदारांनी सागर उईके यांस लााथाबुक्यांनी मारहाण केली.

तसेच त्याच्याकडील दगड फेकून मारुन आशा उईके यांना त्यांच्या आदीवासी समाजावरुन जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी आशा अंजेश उईके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहा ते सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...