spot_img
अहमदनगरपुन्हा अहमदनगर हादरलं! सासुरवाडी गाठत सरफिऱ्या जावयाचं भयंकर कृत्य? मेहुण्याच्या ३ वर्षीय...

पुन्हा अहमदनगर हादरलं! सासुरवाडी गाठत सरफिऱ्या जावयाचं भयंकर कृत्य? मेहुण्याच्या ३ वर्षीय बाळाला संपवल!

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
तळपायाची आग मस्तकात जाईल अशा संतापजनक घटनेने पुन्हा अहमदनगर हादरलं आहे. एका सरफिऱ्या जावयान सासुरवाडी गाठत मेहुण्याच्या ३ वर्षीय बाळाचं अपहरण केलं. इतक्यावरच न थांबता त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. राहुल बोधक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर स्नेहदीप असं हत्या झालेल्या बाळाचं नाव आहे.

अधिक माहिती अशी: आरोपी हा वैजापूर तालुक्यात रहिवासी आहे. सततच्या भांडणामुळे त्याची बायको श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे माहेरी निघून गेली होती. ती परत नांदायला येत नसल्याने आरोपीला राग अनावर झाला. आठ दिवसांपूर्वी आरोपीने आपलं सासर गाठलं.

तिथे मेव्हण्याशी (बायकोच्या भावाशी) वाद झाल्यानंतर त्याने ३ वर्षीय बाळाचं अपहरण केलं. यासंदर्भात ६ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी राहुल बोधक याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वैजापूर तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.

मात्र, मृतदेह नेमका कुठे फेकला याबाबत विचारणा केली असता आरोपी राहुल उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी सर्व बाजूने तपास करत प्रकरणाचे धागेदोरे जुळवले आणि अखेर वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला ते संभाजीनगर रोडवरील गारच शिवारातील एका मक्याच्या शेतात चिमुकल्याचा मृतदेह शोधून काढला.

नराधम आरोपी राहुल बोधक याने स्नेहदिप याला तोंड दाबून मारल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्येचा अधिक उलगडा होणार आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...