spot_img
अहमदनगरअहमदनगर: भिंगारमध्ये 'धक्कादायक' प्रकार! तरुणावर धारधार शस्राने वार, कारण काय? पहा..

अहमदनगर: भिंगारमध्ये ‘धक्कादायक’ प्रकार! तरुणावर धारधार शस्राने वार, कारण काय? पहा..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
सासऱ्याला दिलेले पैसे परत न दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार शस्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नगरच्या भिंगारमध्ये घडला आहे. कुमार सुभाष हजारे (वय २८ रा. सुदर्शन कॉलनी, वडारवाडी, भिंगार) असे हल्ला झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून आठ ते नऊ जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा बळराम खिळे, गोविंद बळराम खिळे, अर्जुन भिंगारदिवे, अनीकेत शिरसाठ (पूर्ण नावे माहिती नाही) व इतर तीन ते चार अनोळखी (सर्व रा. सिटीझन कॉलनी, वडारवाडी, भिंगार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: रविवारी (दि. १७) दुपारी कुमार हजारे त्यांच्या दुचाकीवरून वडारवाडी येथे जात असताना त्यांना वरील संशयित आरोपींनी भारव्दाज किराणा दुकानासमोर, भिंगार येथे अडविले. सासऱ्याला दिलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून लोखंडी कोयता, चॉपर, लाकडी दांडके व दगडाने जीवघेणा हल्ला केला.

शिवीगाळ, दमदाटी केली. या हल्ल्यात कुमार हजारे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नगरमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान भिंगार कॅम्प पोलिसांना दिलेल्या जबाबावरून मंगळवारी (दि. १९) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोरसे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बच्चू कडू यांच्याबद्दल विखे पाटीलांचे मोठे विधान

राहाता / नगर सह्याद्री - Radhakrishn Vikhe Patil | Bachchu Kadu : महाराष्ट्रात महायुतीच्या...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसला....

आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नका!; पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना राठोड यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत. कोणीही तुटणार...

तनपुरे यांना पराभव अमान्य! इव्हीएम पडताळणीसाठी अर्ज

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार...