spot_img
ब्रेकिंगअहमदनगर: सात प्रवाशांचे बळी गेले?, नंतर 'त्या' चौकात स्पीड ब्रेकर आले!

अहमदनगर: सात प्रवाशांचे बळी गेले?, नंतर ‘त्या’ चौकात स्पीड ब्रेकर आले!

spot_img

पारनेर ।नगर सहयाद्री:-
दिवसेंदिवस होणाऱ्या अपघातांमुळे कल्याण- नगर महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला त्यामुळे या महामार्ग वरील आणे व पेमदरा (ता.जुन्नर) गावांच्या सरहद्दीवर असणाऱ्या नांदूर पठार रोड चौकात भरधाव वाहनांमुळे आजपर्यंत सात जणांचे बळी गेले आहेत. तसेच अनेक जखमी झाले आहेत. त्यावर वारंवार ग्रामस्थांनी मागणी करून रविवार दि.४ रोजी या जागी अखेर स्पीड ब्रेकर टाकण्यात आले. त्यामुळे बळी गेलेल्या कुटुंबियांचं दुःख, अनेक जणांच्या भळभळत्या जखमा तसेच फ्रॅक्चर झालेल्यांच्या वेदनांवर प्रशासनाने स्पीडब्रेकररूपी फुंकर घातली आहे. अखेर अनेक दिवसांची प्रलंबित मागणी पूर्ण करण्यासाठी रस्ते प्रशासनाने कसली कंबर असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले.

श्रीक्षेत्र आणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरदार पटेल हायस्कूल तसेच राष्ट्रीय काँग्रेस (आय) पक्षाचे माजी तालुध्यक्षांची असणारी आश्रमशाळा अशा वर्दळीच्या ठिकाणापासून फर्लांगभर अंतरावर नांदूर पठार रोड चौक आहे. सन २०१९ साली ऐका शालेय विद्यार्थ्यांने आपला पाय गमावल्यानंतर तिथे आशा बुचकेंनी आंदोलन केल्यानंतर रबरी गतीरोधक बसविण्यात आले होते. रस्ते प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही नियमानुसार हायवेला डांबरी गतिरोधक टाकता येत नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

अवजड वाहनांमुळे रबरी गतिरोधक टिकू शकत नाहीत अशी टीका देखील केली जाते. आणे व पेमदरा ग्रामपंचायतच्या सरपंचांनी पुढाकार घेवून आजी-माजी आमदार अतुल बेनके व शरद सोनवणे यांच्या कानावर हा प्रश्न घालत प्रशासनाला धारेवर धरले व गुळुंचवाडी प्रमाणे डांबरी गतिरोधक बसवा अशी सूचना केली होती.गुळुंचवाडी येथील भयानक अपघातानंतर जाग आलेल्या रस्ते प्रशासनाकडून ऐन पावसाळ्यात डांबर उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. अखेर आणे गावच्या सरपंच प्रियंका प्रशांत दाते व पेमदरा गावच्या सरपंच जयश्री पाटीलबा गाडेकर यांना अधिकाऱ्यांनी पावसाळा संपल्यानंतर डांबरी गतिरोधक बसविण्याचा शब्द दिला.

परंतु तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक वर्गातून मागणी करण्यात आल्याने तात्काळ गतीरोधक बसवावेत अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यवस्थापन समितीने दिल्यानंतर प्रशासनाने अखेर रबरी गतिरोधक बसविण्याचा निर्णय घेत काम पूर्ण करण्यात आले. आणे येथील दोन्ही चौकात गतिरोधक बसविण्यात आल्यानंतर ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

अपघात टाळण्यास होणार मदत
नगर कल्याण महामार्गावर अनेक अपघात वारंवार घडतात नांदूर पठार चौकामध्ये ही आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत त्यामुळे वारंवार ग्रामस्थांनी चौकामध्ये स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने प्रशासनाने आता स्पीडब्रेकर बसवले आहेत. त्यामुळे होणारे अपघात टाळण्यास मदत होणार आहे.
-सुनील तांबोळी (स्थानिक प्रवासी)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....

तयारीला लागा! जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या आरक्षणाचा फुगा फुटला, अनेक दिग्गजांना मोठा धक्का, कुठे काय निघाले आरक्षण पहा

अहिल्यानगर झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव / जिल्ह्यातील दिग्गजांना मोठा धक्का | राज्यातील...

एसईबीसी, ईडब्लूएस, ओपन आरक्षण नको का?; मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले पहा

मराठा समाजाला सवाल | नेत्यांनाही धरले धारेवर नाशिक | नगर सह्याद्री राज्यातील मराठा समाजाला आतापर्यंत त्यांच्यासाठी...

धक्कादायक! हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्ली, मुंबईत खळबळ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था दिल्लीतील नामांकित शाळा बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी ताजी असतानाच आता...