spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यावर अजित दादांचे लक्ष ! लोकसभेसाठी...

Ahmednagar Politics : ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यावर अजित दादांचे लक्ष ! लोकसभेसाठी ‘या’ जागेवर केला दावा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोनपैकी एका जागेवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा केला आहे. सध्या खा. सुजय विखे अहमदनगरमधून तर खा. सदाशिव लोखंडे शिर्डीमधून विद्यमान खासदार आहेत. अजित पवार यांनी यापैकी एक जागा मिळावी, असे भाजप आणि शिवसेनेच्या नेतृत्वाकडे मागणी केल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप (अजित पवार गट) या संदर्भात म्हणाले, पक्षाला अहमदनगर किंवा शिर्डीतून निवडणूक लढवायची आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्वादीचे आहेत. अजित पवार यांनी या मुद्यावर भाजप आणि शिवसेनेच्या राज्य नेतृत्वाला विनंती केली आहे. त्यामुळे आमचा पक्ष अहमदनगर जिल्ह्यात एक जागा मिळविण्यासाठी आशावादी आहे.

आ. जगताप लोकसभा निवडणुकीशी संबंधित कामांसाठी महायुतीचे समन्वयक आहेत. ते म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने १२ पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवार गटात चार आमदार आहेत. जे जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. आमच्या आमदारांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती. त्यामुळे जिल्ह्यातील एका लोकसभा जागेसाठी आमचा पक्ष स्वाभाविकपणे दावेदार आहे.

आ. नीलेश लंके यांचे दबावतंत्र?
राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आ. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी अलीकडेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य संपर्क यात्रा काढली होती. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या चर्चेनुसार, अजित पवार यांच्या काही आमदारांनी महायुतीच्या बैठकीस न येणे व लंके दाम्पत्याची यात्रा हे महायुतीमधील घटकांवर दबाव टाकण्यासाठी होते. आ. लंके यांनी आपल्या यात्रेचा लोकसभा निवडणुकीशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

भाजपने शयता फेटाळली
जिल्ह्यातील दोनपैकी कोणतीही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळण्याची शयता अहमदनगर भाजपने फेटाळून लावली आहे. अहमदनगरची जागा २००९ पासून भाजप जिंकत आहे. भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव केला असल्याने ही जागा त्यांना जाण्याची शयता नाही, असे म्हटले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपाची प्रभाग रचना, आरक्षण जाहीर करण्यास विलंब का? ; मनमानी पद्धतीने प्रभागांची तोडफोड करू देणार नाही

  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा इशारा अहिल्यानगर / नगर सह्याद्री- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश...

आरक्षण सोडतीने पारनेरचे राजकारण तापले; महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी...

निघोज जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात चुरशीची निवडणूक रंगण्याचे संकेत

आरक्षण जाहीर; निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात, दिवाळीमध्येच प्रचाराचा धडाका निघोज । नगर सहयाद्री:- निघोज जिल्हा...

मनपा निवडणूक मॅनेज करण्याकरिता हस्तक्षेप; ‘यांनी’ केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

अंतिम प्रभाग रचना जाहीर न झाल्याने ठाकरे शिवसेनेची राज्य निवडणूक आयोगाकडे क्रार अहिल्यानगर | नगर...