spot_img
अहमदनगरअहमदनगर पोलिसांची मोठी कारवाई; चार 'पिकअप' मध्ये काय गवसलं? वाचा सविस्तर

अहमदनगर पोलिसांची मोठी कारवाई; चार ‘पिकअप’ मध्ये काय गवसलं? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शिरूर (जि. पुणे) येथून नगर शहरातील मंगलगेट भागात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन येणार्‍या चार पिकअप तोफखाना पोलीस व शहर वाहतूक शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून पकडल्या. त्यातून लहान- मोठे मिळून 66 जनावरे, चार पिकअप असा एकूण 11 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेतले आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार मन्सुर सय्यद यांनी फिर्याद दिली आहे. वसीम इसाक सय्यद (वय 35 रा. खाटीक गल्ली, राहुरी), आतिक लतीफ कुरेशी (वय 32 रा. इस्माईलनगर, राहुरी), सुलतान एनुद्दिन मदारी (वय 36 रा. इस्लामपुरा, मदारी वस्ती, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे) व इरफान शेख (रा. कोठला) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

इरफान शेख हा पसार झाला आहे. नगर- पुणे महामार्गावरून शिरूर येथून नगर शहरातील कोठला भागातील मंगलगेट येथे चार पिकअपमधून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी आणली जात असल्याची माहिती काल, बुधवारी पहाटे वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना मिळाली होती. त्यांनी रात्र बंदोबस्तावर असलेले पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, पोलीस अंमलदार सय्यद, अतुल लगड, राजू गव्हाण, मधुकर ससे यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विनोद गंगावणे, दीपक जाधव, सचिन बाचकर, सावळेराम क्षीरसागर यांना सोबत घेतले.

या पथकाने पहाटे सहाच्या सुमारास कोठला भागात नाकाबंदी केली असता शिरूर बाजूकडून कोठल्याच्या दिशेने येणार्‍या चार संशयित पिकअप पोलिसांनी थांबविल्या. त्यातील चौघांना ताब्यात घेतले. त्या पिकअपची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये पाच मोठी व 61 लहान अशी एकूण 66 जनावरे मिळून आली. सदरची जनावरे इरफान शेख याच्या मालकीची असल्याची कबुली पिकअपमधील चौघांनी दिली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार व्ही. सी. गंगावणे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...