spot_img
अहमदनगरAhmednagar News: दोन 'वाँटेड' जेरबंद! 'असा' लावला सापळा

Ahmednagar News: दोन ‘वाँटेड’ जेरबंद! ‘असा’ लावला सापळा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
मारहाण करून लूटमार प्रकरणातील वाँटेड असणार्‍या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. प्रविण उर्फ पचास नानासाहेब वाघमारे (वय -२५ वर्षे, रा. पिंपळस, ता. राहाता), सचिन कल्याणराव गिधे (वय २६ वर्षे, रा. समर्थनगर, ता. कन्नड) असे आरोपींची नावे आहेत. त्यांना सुपा एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले.

अधिक माहिती अशी : ३ फेब्रुवारी रोजी सतीश शंकर पुरम (वय ४२ वर्षे, रा. शिर्डी) हे त्यांचा मुलगा साईसुशांत याबरोबर मोटारसायकलवर घरी जात असतांना शिर्डी ते साकुरी शिव रोडवर त्यांना तीन आरोपींनी अडवून लुटले होते. त्यांच्याकडून गळ्यातील सोन्याची चैन, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

या घटनेबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आरोपी प्रमोद हरी लोखंडे (रा.पिंपळस ता.राहाता) यास अटक करण्यात आलेली होती. हा गुन्हा वरील दोन साथीदारांसह केल्याचे त्याने कबूल केले होते. या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक शोध घेत असताना हे आरोपी सुपा एम.आय.डी.सी. परिसरामध्ये आल्याची माहिती मिळाली. तेथे जात स्थानिक गुन्हे शाखेने वरील आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास राहाता पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आदींच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, संदीप चव्हाण, फुरकान शेख, संतोष खैरे, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे आदींनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...