अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरातील साईदीप हॉस्पिटल मध्ये एका गरोदर महिलेची सातव्या महिन्यातच प्रसूती झाली. महिलेने दोन जुळ्या बालकांना जन्म दिला. यातील एका बाळावर आतड्यांची शस्त्रक्रिया आणि दुसर्या बाळावर फुप्फुसाचे नियमित कार्य यासाठी उपचार करण्यात आले. त्यानंतर ४१ दिवसानंतर दोन्ही बाळ सुदृढ झाल्यावर डिस्चार्ज करण्यात आला.
साईदीप हॉस्पिटल मधील प्रसूती तज्ञ डॉ. वैशाली किरण यांना एका महिलेची मुदतपूर्व प्रसूती करावी लागली. जुळी बालके जन्माला आली. त्यातील एकाबाळाचे वजन फक्त ९०० ग्राम तर दुसर्या बाळाचे वजन १ किलो होते. एका बाळाची वा न झाल्यामुळे बाळाची आतडी फुटली. त्यावरीत शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते.
अशावेळी नवजात बाळाचे शल्य चिकित्सक डॉ.रुपेश शिकची आणि नवजात बाळाचे भूल तज्ञ डॉ. ललित जोशी नवजात अतिदक्षता विभागच्या प्रमुख डॉ.मेहवॉश साहिल यांनी नातेवाईक यांच्या सहमतीने आतड्यांची शस्त्रक्रिया करून बाळाला जीवनदान दिले. दुसर्या बाळाला श्वसन विकार असल्याने व्हेंट्लिेटर द्वारे उपचार करून जीवनदान दिले.
प्रसूती आणि नवजात अतिदक्षता विभागामधील सर्व डॉटर्स आणि नर्सेस यांनी मेहनत घेऊन दोन्ही बाळांना जीवनदान दिले. त्यांचे वजन प्रत्येकी दीड किलो झाल्यानंतर ४१ दिवसांनी त्यांना डिस्चार्ज केले. अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतील तर आवश्यक परिपूर्ण अतिदक्षता विभाग २४ तास साईदीप हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे अशी माहिती डॉ.मेहवॉश साहिल यांनी दिली. नातेवाईकांनी सर्व डॉटर्स टीम आणि नवजात अतिदक्षाता विभागाचे आभार मानले.