spot_img
ब्रेकिंगAhmednagar News : हरेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवाजी शिर्के

Ahmednagar News : हरेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवाजी शिर्के

spot_img

दत्तात्रय आंधळे उपाध्यक्ष, एकनाथ दाते सचिव, बाबासाहेब उंडे खजिनदार तर बाळासाहेब उंडे सहसचिव

पारनेर / नगर सह्याद्री
तालुक्यातील क वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असलेल्या कर्जुले हरेश्‍वर येथील श्री हरेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के यांची निवड करण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.

ग्रामस्थ व देणगीदारांच्या आर्थिक मदतीने भगवान श्री शंकराचे सुमारे पावणे पाच कोटी रुपये खर्चुन मंदिर उभारण्यात आले आहे. याशिवाय मंदिराच्या परिसरात विद्युत रोषणाईयुक्त गार्डन आणि आकर्षक असा कारंजा देखील उभारण्यात आला आहे.

देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांची मुदत संपत असल्याने नवे विश्‍वस्त मंडळ निवडण्यासाठी संस्थेचे मावळते अध्यक्ष बबन शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली सभासद व ग्रामस्थांची वार्षिक सभा नुकतीच श्री हरेश्‍वर मंदिरात घेण्यात आली. या सभेत मंदिर जिर्णोद्धार कामाचा आढावा घेण्यात आला. संस्थेचे मावळते सचिव शिवाजी शिर्के यांनी कामाचा आढावा घेतानाच झालेल्या जमाखर्चाचा आढावा सादर केला. याशिवाय मंदिर जिर्णोद्धार काम आणि मंदिर परिसरात क वर्ग तिर्थक्षेत्र योजनेतून करण्यात येणार्‍या कामांबाबत माहिती दिली.

संस्थेच्या नव्या पदाधिकार्‍यांची निवड यावेळी करण्यात आली. त्यानुसार संस्थेच्या सचिवपदी एकनाथ दाते, उपाध्यक्षपदी दत्तात्रय विठ्ठल आंधळे, सहसचिवपदी बाळासाहेब विठ्ठल उंडे तर खजिनदारपदी बाबासाहेब भास्कर उंडे यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या संचालक मंडळावर बबनशेठ शंकर शिर्के, लहूशेठ बबन मुळे, प्रमोद पंढरीनाथ कोकाटे साहेब, डॉ. विलास विष्णू जाधव, गोरक्षशेठ तुकाराम वाफारे, ज्ञानदेव सखाराम शिंदे, शशिकांत भागाजी आंधले, संतोष भिमाजी हुळवळे, सीताराम रामचंद्र उंडे, बाळासाहेब शंकर आंधळे, बाबाजी पंढरीनाथ आंधले, संदीप बाळशिराम आंधळे, गंगाराम गणपत उंडे यांची निवड करण्यात आली.

नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांसह संचालक मंडळाचे गावकर्‍यांनी अभिनंदन केले असून गावकर्‍यांच्या विश्‍वासास पात्र ठरेल असे काम करण्याचा निर्धार यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डोनाल्ड टॅम्प यांनी फोडला टॅरिफ बॉम्ब, शेअर बाजारात भूकंप, घडले असे…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली...

सोलापूर हादरलं! थायलंडच्या भूकंपानंतर महाराष्ट्रातही 3 ठिकाणी धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सोलापूर / नगर सह्याद्री - गेल्या आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने बँकॉकसह शेजारील देशांमध्ये...

खडकी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; विद्यार्थ्यांचे ‘मिशन आरंभ’मध्ये उतुंग यश

खडकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम सुनील चोभे | नगर सह्याद्री जिल्हा परिषद...

डुप्लिकेट चावीची कमाल, चार लाख छूमंतरल; नगरमध्ये घडलं असं काही..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून आत प्रवेश करत 11 तोळे आठ...