अहमदनगर : भाड्याने दिलेल्या लोखंडी प्लेटांचे पैसे मागितले या कारणांतून दोघांनी एकास बेदम मारहाण केली. गणेश राजू चव्हाण असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून अशोक रामदास बेरड, प्रविण सुरेश बेरड (दोघे रा. दरेवाडी) असे आरोपींची नावे आहेत.
त्यांनी गणेश यांना दगडाने,लाकडी दांडक्याने मारहाण केली. गणेश यांनी रामदास, प्रविण यांना लोखंडी प्लेटा भाडोत्री तत्वावर दिलेल्या आहेत. त्याचे पैसे गणेश यांनी त्यांना मागितले.
याचा राग येऊन आरोपींनी गणेश यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. आरोपींनी गणेश यांच्या डोक्यात दगड मारत जखमी केले. एकाने त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेनंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.