spot_img
अहमदनगरAhmednagar News : भिंगारमध्ये ट्रक खाली चिरडून प्राचार्यांचा मृत्यू

Ahmednagar News : भिंगारमध्ये ट्रक खाली चिरडून प्राचार्यांचा मृत्यू

spot_img

अहमदनगर : भिंगार मधून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था गेल्या अनेक महिन्यांपासून कायम असून या महामार्गावरील खड्ड्यांमुळे भिंगार मध्ये शुक्रवारी (दि.२) सकाळी आणखी एकाचा बळी गेला आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकी घसरून खाली पडलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून मालट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

पाथर्डी कडे जाणाऱ्या रोडवर भिंगार वेशीच्या पुढे असलेल्या कमानीजवळ सकाळी ८.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार सुनील विजयकुमार बेरड (वय ५२, रा. शहापूर, ता. नगर) यांचा मृत्यू झाला आहे. मयत बेरड हे आठरे पाटील पब्लिक स्कुल मध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी ते शहापूर येथून मोपेडवर भिंगार मार्गे नगरकडे येत असताना जिल्हा बँकेच्या शाखे समोर रस्त्यावर असलेले खड्डे चुकविताना त्यांची मोपेड घसरली व ते रस्त्यावर खाली पडले, त्याचवेळी पाठीमागून येत असलेल्या मालट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले.

हेल्मेट घातलेले असूनही अवजड मालट्रक चे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सकाळीच हा अपघात झाल्याने तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या अपघाताने बराच वेळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या अपघाताची माहिती मिळताच भिंगार कम्प पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत बेरड यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...